Saturday, April 20, 2024
HomeCrimeलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर 13 सराईत गुन्हेगार तडीपार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर 13 सराईत गुन्हेगार तडीपार

Deportation action against 13 serial criminals in the backdrop of Lok Sabha elections

चंद्रपूर :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्हा पोलीस सक्रिय झाले असुन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांचे मार्गदर्शनाखाली सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई ची धडक मोहीम राबविण्यात येत आहे.

आगामी लोकसभा निवडणुक 2024 च्या तोंडावर जिल्हयात शांतता अबाधित राखण्याकरीता चंद्रपूर जिल्हयातील शरीरा विरूध्द व मालमत्ते विरूध्दचे विविध गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यासंबंधाने पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी आदेश पारीत करताच शुभम अमर समुद, वय 26 वर्ष रा. पंचशिल वार्ड चंद्रपर, शाहरूख नुरखा पठाण वय 29 वर्ष रा. अष्टभुजा वार्ड जयश्री लॉन जवळ चंद्रपूर, नैनेश उर्फ लाला नितीन शहा वय 31 वर्ष रा. लुंबिनी नगर बाबुपेठ वार्ड चंद्रपूर, मोहन केशव कुचनकर वय 25 वर्ष रा. चिरघर लेआउट वरोरा ता. वरोरा, दर्शन उर्फ बापु अशोक तेलंग वय 22 वर्ष रा. मौलाना आझाद वार्ड बललारशाह, मुनिर खान वहीद खान पठाण वय 55 वर्ष रा. शिवनगर नागभिड ता. नागभिड व शिवशाम उर्फ भिस्सु दामोधर भुर्रे वय 25 वर्ष रा. हनुमान नगर ब्रम्हपुरी यांना मागील आठवडयामध्ये कलम 56 (1) (अ) (ब) मपोका अन्वये 6 महिन्यात करीता चंद्रपूर जिल्हयातुन तडीपार करण्यात आलेले आहे.

तसेच या आठवण्यात घुग्घुस पोलीस स्टेशन येथील अरविंद बापुजी उरकुडे वय 45 वर्ष रा. अमराई वार्ड क. 1 घुग्घुस, प्रताप रमेश सिंग वय 26 वर्ष रा. अमराई वार्ड क. 1 घुग्घुस, रामनगर पोलीस स्टेशन येथील शामबाबू चंद्रपाल यादव वय 29 वर्ष रा. बिएमटी चौक रयतवारी कॉलरी चंद्रपूर, राजेश मुन्ना सरकार वय 47 वर्ष रा. इंडस्ट्रीयल वार्ड बंगाली कॅम्प चंद्रपूर, संतोष उर्फ विक्की भास्कर दुसाने वय 30 वर्ष रा. सिस्टर कॉलनी चंद्रपूर आणि अरबाज जावेद कुरेशी वय 26 वर्ष रा. आकाशवाणी रोड हवेली गार्डन चंद्रपूर यांना कलम 56 (1) (अ) (ब) मपोका अन्वये 6 महिणे व 1 वर्षा करीता चंद्रपूर जिल्हयातुन तडीपार करण्यात आलेले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर रिना जनबंधू यांचे मार्गदर्शनात नाओमी साटम, उविपोअधि, वरोरा, सुधाकर यादव, उविपोअधि, चंद्रपूर, दिपक साखरे, उविपोअधि राजुरा, दिनकर ठोसरे, उविपोअधि, ब्रम्हपुरी, महेश कोंडावार, पोलीस निरीक्षक, स्थागुशा चंद्रपूर तसेच पोलीस निरीक्षक पो. स्टे. बल्लारशाह आसिफराजा, पो. नि. पो. स्टे. ब्रम्हपुरी, अनिल जिटटावार, पो.नि. पो. स्टे. नागभिड, विजय राठोड, पो. नि. पो. स्टे. रामनगर सुनिल गाडे, पो. नि. पो. स्टे. घुग्घस शाम सोनटक्के यांनी मोलाची कामगिरी बजावुन आता पर्यंत नमुद सराईत इसमांना चंद्रपूर जिल्हयातुन तडीपार करण्यात आलेले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular