Saturday, April 20, 2024
HomeCrimeकंत्राटदारास लाचेची मागणी ; ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात

कंत्राटदारास लाचेची मागणी ; ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात

Demand for bribe from construction contractor;  Gramsevak in custody of Anti-Corruption Department

चंद्रपूर :- ब्रम्हपुरी तालुक्यातील झिलबोडी येथील प्राथमिक शाळेचे शौचालय, मुतारी बांधकाम तसेच मौजा परसोडी जानी येथील अंगणवाडीचे शौचालय, मुतारी व किचन शेडचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार यांना 15 हजारांची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकाला 10 हजारांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. Bribe

सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार हे मौजा झिलबोडी ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर येथील रहीवासी असुन ठेकेदारीचा व्यवसाय करतो. Construction Contractor तकारदार यांनी जिल्हा परीषद चंद्रपूर अंतर्गत 15 व्या वित्त आयोगामधुन सन 2021 ते 2022 च्या दरम्यान ग्रामपंचायत झिलबोडी येथील जिल्हा परीषद प्राथमीक शाळेचे शौचालय, मुतारी घर बांधकाम ईत्यादी कामे व मौजा परसोडी जानी येथील अंगणवाडीचे शौचालय, मुतारी घर बांधकाम व किचन शेडचे बांधकाम ईत्यादी कामे केली होती.
सदर कामाचे एकुण 3,90,000/- रुपये तक्रारदार यांना ग्रामपंचायत कार्यालय झिलबोडी येथील ग्रामसेवक पुरुषोत्तम यशवंत टेंभूरने यांनी (कंत्राटदार) तक्रारदार यांना चेकद्वारे देण्यात आले होते. तक्रारदार यांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणुन ग्ग्रामपंचायत कार्यालय झिलबोडी येथील ग्रामसेवक पुरुषोत्तम टेंभुर्णे यांनी 15000 रुपयाची मागणी केली होती. परंतु तक्रारदार यांना गैरअर्जदार यांस लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांना भेटून तकार दिली.

प्राप्त तकारीवरुन दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी पडताळणी कार्यवाही करण्यात आली. पडताळणी कार्यवाही दरम्यान लाच रक्कमेची मागणी स्पष्ट झाल्याने व तळजोडीअंती 10,000 रुपये स्विकारण्याची तयारी दर्शवीली असल्याने दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आलेल्या सापळा कार्यवाहीदरम्यान गै.अ. ग्रामसेवक यांनी तकारदाराकडे 15000 रुपयांची मागणी करुन तडजोडीअंती 10000 रुपये गै.अ. पुरुषोत्तम टेंभुर्णे यांनी पंचासमक्ष स्वता लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले असुन पुढील तपास कार्य सुरू आहे.

सदरची कार्यवाही श्री. राहुल माकणीकर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर, श्री. संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर तसेच श्रीमती मंजुषा भोसले, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, नापोशि, संदेश वाघमारे, पो.कॉ. वैभव गाडगे, राकेश जांभुळकर, सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर व चा.पो.कॉ. विनायक वंजारी मो.प.वि. चंद्रपूर यांनी यशस्वी पार पाडली.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा

श्री. राहुल माकणीकर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर,

श्री. संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कार्यालय नागपूर ०७१२-२५६१५२०

श्रीमती मंजुषा भोसले, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. चंद्रपूर-९३२२२५३३७२

श्री. प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. चंद्रपूर-९१३०५५६१६१ श्री. जितेंद्र गुरनुले, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. चंद्रपूर-८८८८८५७१८४

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक – 07172- 250251

टोल फ्रि क्रमांक – 1064

Website: www.acbmaharashtra.gov.in

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular