Thursday, February 22, 2024
Homeआमदारजिर्ण अवस्थेत असलेल्या शाळा निर्लेखीत करुन महिण्याभरात प्रस्ताव सादर करा - आ....

जिर्ण अवस्थेत असलेल्या शाळा निर्लेखीत करुन महिण्याभरात प्रस्ताव सादर करा – आ. किशोर जोरगेवार : ग्रामीण भागाच्या विविध विषयांना घेउन जिल्हा परिषद येथे आढावा बैठकीचे आयोजन

Delist the dilapidated schools and submit a proposal within a month – Mla Kishore Georgewar ; Organizing a review meeting at Zilla Parishad on various issues of rural areas

चंद्रपूर :- ग्रामीण भागाच्या सर्वसमावेशक विकासासाठी आमचे प्रयत्न सुरु आहे. शिक्षण, आरोग्य आणि मुलभुत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्याबाबत येथील नाररिकांनी काळजी घ्यावी, जिल्हा परिषदेनेही याबाबत जनजागृती करावी. तसेच या भागातील जिर्ण अवस्थेत असलेल्या शाळांचे बांधकाम करण्यासाठी अशा शाळा निर्लेखीत करुन महिण्याभरात प्रस्ताव सादर करा अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाॅन्सन यांना दिल्या आहे.

मतदार संघातील विविध विषयांना घेउन आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा परिषद येथे बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुभाष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना सांळुखे, नरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधूकर वासनिक, जिल्हा आरोग्य अधिकारी अशोक कटारे, प्राथमीक शिक्षण अधिकारी राजकुमार हिवारे, कार्यकारी अभियंता नुतन सावंत, यंग चांदा ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, वढाचे संरपंच किशोर वरारकर, सोनगेगाव सरपंच संजय उकीनकर, धानोरा विजय आगरे, कोसारा सरपंचा ऋतिका नरुले, मोरवा सरपंचा स्नेहा साव, पांढरकवडा सरपंच सुरज तोतडे, उसगाव सरपंच निवेदीता ठाकरे, म्हातारदेवी सरपंचा सध्या पाटील, बेलसनी सरपंचा इंदिरा पोले, छोटा नागपूर सरपंचा चित्रा गणफाडे, ताडाळी सरपंच संगीता पारखी, साखरवाही सरपंच नागेश बांेडे, दाताळा सरपंच सुनिता देशकर, वेंडली सरपंचा अलवलवार, पिपरी सरपंचा मातने, मारडा सरपंच गणपत चैधरी, छोटा नागपूर उपसरपंच ऋषभ दुपारे, यंग चांदा ब्रिगेडचे अशोक पारखी, धनंजय ठाकरे, मुन्ना जोगी, अनिल नरुले, रुपेश झाडे, भोला अतकारी, गुड्डू सिंग, भाग्यवाण गणफुले, अजय गौरकार, करण नायर आदींची उपस्थिती होती.

मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेवर ग्रामीण भागाच्या विकासाची मोठी जबाबदारी आहे. आपण या भागात काम करत असतांना नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे. अवकाळी पावासामुळे झालेल्या नुकसाणीचे तात्काळ पंचणामे करा, प्रत्येक गावात पशु, गुरे यांची नियमीत वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, २०१६ पासूनचे वृद्ध कलावंत मानधन योजना वृद्धांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत त्यावर काय कार्यवाही करण्यात यावी, २०२१ मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील गावातील लोकसंख्येच्या अनुषंगाने प्रत्येक गावात संविधान सभागृह बांधणे करिता प्रस्ताव मागविण्यात आले होते त्या संदर्भात करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यात यावा, दिव्यांग यांना जिल्हा परिषद दिव्यांग विभागाच्या वतीने शासनाच्या योजनांची माहिती देण्याकरीता विशेष योजना राबविण्यात यावी, चिंचाळा, नागाळा, सिदूर, वेंडली, धानोरा, पिपरी, शेणगाव या सात गावातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, ग्रामीण भागात रोजगार स्वयंमरोजगार निर्मितीकरिता जिल्हा परिषद अंतर्गत अभियान राबविण्यात यावे, जिल्हा परिषद अंतर्गत राबविल्या जात असलेल्या विविध शासकीय योजना प्रत्येकाच्या दारी पोहचण्याकरिता यंत्रणा कार्यन्वित करण्यात यावी, शासकीय योजनांच्या लाभासाठी एक खिडकी उपक्रम राबविण्यात यावा, यासह अनेक सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी या बैठकीत अधिका-यांना केल्या आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular