Delhi Women’s Team Wins MLA Cup of Kabaddi Tournament, Vitthal Krida Manlad Wins Men’s Team
◆ पुरस्कार वितरण कार्यक्रमाने कबड्डी स्पर्धेचा समारोप, आमदार किशोर जोरगेवार यांची प्रमूख उपस्थिती
चंद्रपूर :- आमदार किशोर जोरगेवार Mla Kishor Jorgewar यांच्या संकल्पेनतून आयोजित श्री माता महाकाली क्रिडा महोत्सवा ला सुरवात करण्यात आली आहे. या महोत्सवा निमित्त जय श्रिराम क्रिडा मंडळ, चंद्रपूर च्या वतीने आयोजित कबड्डी स्पर्धेचा बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमाने समारोप करण्यात आला आहे. यात दिल्लीच्या महिला संघाने आमदार चषक पटकाविला आहे तर पूरुष गटात विठ्ठल क्रिडा मंळड, चंद्रपूरचा संघ विजयी झाला आहे. विजयी संघाना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरित करण्यात आले.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार, यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे, मधूरकर बनकर, भास्कर कावळे, शरद बनकर, अमीत लडके, ताहिर हुसेन, राम जंगम, अतुल बनकर, पिंटु गावतूरे, राजेश गुटके, किशोर रायपूरकर, मंगला आखरे, नकुल वासमवार, राशेद हुसेन, कार्तिक बोरेवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती. Kabaddi tournament concludes with award distribution program, prominent presence of MLA Kishore Jorgewar
चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून श्री माता महाकाली क्रिडा महोत्सवाला सुरवात करण्यात आली आहे. बिनबा वार्ड येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेने या महोत्सवाला सुरवात करण्यात आली होती. तर २ फेब्रुवारी पासून भिवापूर येथील माता नगर येथे कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यात परभणी, वासीम, लातूर यासह राज्याबाहेरील दिल्लीच्या दोन महिला संघाने सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेत ४० संघ सहभागी झाले होते. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाने समारोप करण्यात आला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांची प्रामूख्याने उपस्थिती होती.
यावेळी झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात दिल्लीच्या संघाने बाजी मारली तर पुरुष खुल्या गटात विठ्ठल मंदिर क्रिडा मंडळ, चंद्रपूरचा संघ विजयी झाला.
यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, एक उत्तम आयोजन येथे करण्यात आले. यात दिल्लीच्या संघाने सहभाग घेतला हेच श्री माता महाकाली क्रिडा महोत्सवाचे यश आहे. या महोत्सवाला आपण चंद्रपूरची अराध्य दैवत माता महाकालीचे नाव दिले आहे. त्यामुळे आता या महोत्सवाच्या माध्यमातून मातेचा नावाचा जयघोष दिल्लीत पोहचला आहे. या भागाच्या विकासासाठी आपण कटिबध्द आहोत. येथील मंडळाने कबड्डी मॅटची मागणी केली आहे. ती मान्य आहे. क्रिडा क्षेत्रासाठी शक्य ते सर्व सहकार्य करण्याचा आमचा मानस असल्याचे ते यावेळी म्हणाले.
नागरिकांच्या वतीने जेसीबीने फुलांचा वर्षाव करत आ. जोरगेवार यांचे स्वागत
मागील चार वर्षात आमदार किशोर जोरगेवार यांनी भिवापूर प्रभागाच्या विकासासाठी जवळपास सात कोटी रुपयांना निधी दिला आहे. या निधीतून येथे मुलभुत सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या सुटल्या आहे. या निमित्त आमदार किशोर जोरगेवार यांचे क्रिडा महोत्सवात आगमन होताच जय श्रीराम क्रिडा मंडळ व स्थानिक नागरिकांच्या वतीने चक्क पाच जेसिबी मशीन ने आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर फुलांचा वर्षाव करत त्यांचे भव्य स्वागत केले.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी ही आभार व्यक्त करत येथे आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे म्हटले आहे.