Tuesday, November 5, 2024
HomeAgricultureजलसंपदा विभागामार्फत घेण्यात आलेल्या पदभरतीची अंतिम निवड यादी घोषित करा- आ. किशोर...
spot_img
spot_img

जलसंपदा विभागामार्फत घेण्यात आलेल्या पदभरतीची अंतिम निवड यादी घोषित करा- आ. किशोर जोरगेवार

Declare the final selection list for the recruitment conducted through the Water Resources Department – MLA Kishore Jorgewar demanded after meeting Chief Minister Eknath Shinde.

चंद्रपूर :- जलसंपदा विभागामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल 2 मार्च 2024 ला जाहीर करण्यात आला असला तरी अंतिम पदभरती निवड यादी घोषीत करण्यात आलेली नाही. त्यामुळे सदर अंतिम निवड यादी तात्काळ घोषित करण्यात यावी अशी मागणी MLA Kishor Jorgewar आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांना केली आहे. Declare the final selection list Water Resources

आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालय येथील मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत चंद्रपूर मतदार संघातील विविध विकासकामांवर चर्चा केली. निवडणूकीच्या काळात मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रात प्रचाराची धुरा सांभाळली होती. नक्कीच याचा फायदा महायुतीला दिसून येणार असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले.

सोबतच यावेळी त्यांनी जलसंपदा विभागामार्फत घेण्यात आलेल्या पदभरतीची निवड यादी घोषित करण्याची मागणी केली. सदर मागणीचे निवेदनही आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. Water Resources Department

जलसंपदा विभागामार्फत डिसेंबर २०२३ मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. सर्व पदांच्या परीक्षा डिसेंबर २०२३ मध्येच घेण्यात आल्या व त्यानुसार ०२ मार्च २०२४ ला निकाल देखील जाहीर करण्यात आला. मात्र निकाल जाहीर होऊन आता ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला तरीही विभागामार्फत तात्पुरती आणि अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली नाही. विभागामार्फत आचारसंहितेचे कारण देण्यात येत आहे. वास्तविक आचारसंहितेच्या काळात केवळ नियुक्ती देण्यास परवानगी नसते तरीही विभागाकडून या बाबतीत योग्य कारवाई होताना दिसत नाही.

याच काळात विविध जिल्हा परिषदानी निकाल जाहीर करून कागदपत्र पडताळणीसाठीची प्रक्रिया पूर्ण केल्याचे आढळून आले आहे. आधीच प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांची कमतरता असल्याने शासकीय कामकाजात दिरंगाई होत आहे. त्यातच जलसंपदा विभागातील निवड प्रक्रीयेंतर्गत अंतिम निवड यादी जाहीर करण्यात होत असलेली दिरंगाई योग्य नसल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी निवेदनात म्हटले असून जलसंपदा विभागामार्फत घेण्यात आलेल्या पदभरती अंतर्गत विनाविलंब अंतिम निवड यादी घोषित करण्यासंदर्भात संबंधितांना तातडीने आदेशित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular