Death of fish in village lake due to coal mining Rajesh Bele of Sanjeevani Environment Society demands action
चंद्रपूर :- पवनी वेकोली वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (WCL) च्या बल्लारपूर कोळसा खाणीमुळे निघणाऱ्या घातक रासायनिक द्रव्यांमुळे साखरी गाव तलावातील हजारो मासोळ्या मृत्यू पावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे साखरी गावातील मानवी जीवनावरही धोका निर्माण झाला आहे.
संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थाचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी या प्रकरणी त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दिनांक २० मे २०२४ रोजी, WCL वेकोली बल्लारपूर कोळसा खाणीतून निघणारे घातक रासायनिक द्रव्य साखरी गावातील तलावात मिसळले. यामुळे तलावातील हजारो मच्छी मृत्यू पावल्याची धक्कादायक घटना दिनांक 20 मे रोजी निदर्शनास आली.
वेको्लीतील दूषित पाण्यामुळे हवेमध्ये घातक गॅस पसरल्याने साखरी गावातील लोकांना आरोग्य धोका निर्माण झाला आहे. याव्यतिरिक्त, WCL मुळे होणाऱ्या घातक वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि जमिनीवरील नुकसानीमुळे गावातील लोकांना त्रास होत आहे.
राजेश बेले यांनी WCL विरोधात अनेक आरोप केले आहेत. कोळसा हाताळणी करताना वेकोलीद्वारे घातक वायू प्रदूषण केले जात आहे. घातक रासायनिक द्रव्ये नाल्यात सोडून WCL पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करत आहे. कोळसा खाणीतील धुळीमुळे वायू प्रदूषण होत आहे, जडवाहतुकीमुळेही वायू प्रदूषण होत आहे.
वेकोली च्या बल्लारपूर कोळसा खाणीची पर्यावरण परवानगी रद्द करून, WCL च्या मुख्य प्रबंधक आणि उपमुख्य प्रबंधकांवर पर्यावरण कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा.
वेकोलीमुळे झालेल्या नुकसानीसाठी पीडित गावकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी आदी मागण्या राजेश बेले यांनी केल्या आहेत.