Friday, February 7, 2025
HomeCrimeचंद्रपूरात प्राणघातक शस्त्र जप्त : शहर पोलीसांची कारवाई

चंद्रपूरात प्राणघातक शस्त्र जप्त : शहर पोलीसांची कारवाई

Deadly weapon seized in Chandrapur: Chandrapur city police action

चंद्रपूर :- चंद्रपूर शहर पोलिसांनी प्राणघातक शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीच्या घरची झडती घेत घरातून 2 धारदार जुन्या वापरती जंग लागलेल्या तलवारी व एक धारदार जुनी वापरती गुप्ती असे शस्त्र एकूण 1300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील शस्त्र बाळगणारा आरोपी फरार असून पोलीस त्याच्या तपास घेत आहेत.

चंद्रपूर शहर पोलीस हद्दीत पोउपनी संतोष नींभोरकर डिबी पथकातील अधिकाऱ्यांसह पेट्रोलिंग करीत असतांना लालपेठ परिसरात अग्नीशस्त्राचा वापर होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. गोपनीय माहितीच्या आधारे लालपेठ येथील साहील सिंग याचे घरी झडतीसाठी गेले असता त्याच्या आई समक्ष घराची झडती घेतली असता घरातल्या मधल्या खोलीत लाकडी दिवाण मध्ये प्राणघातक शस्त्र आढळून आले त्यावरून त्याच्या आईला विचारणा केली असता मुलगा साहील सिंग याने आणले सांगितले यावरून शस्त्रबंदी कायद्या अंतर्गत Aarm Act आरोपी साहील सिंग वय 36 वर्ष याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागिय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. प्रभावती एकुरके चंद्रपुर शहर, सपोनि. मंगेश भोंगाडे, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि. सोनाली आगलावे, स. फौ. विलास निकोडे, स. फौ. वाढई, पो. हवा. महेंद्र बेसरकर, पोहवा. विष्णु नागरगोजे, ईमरान शेख, निलेश मुडे, भावना रामटेके, इम्रान खान, रूपेश रणदिवे, रूपेश पराते, सचिन राठोड, रूबीना, पुनम सरकार, अश्विनी बेरड, स्नेहा पेटकुले, चालक पो. हवा. कामडी मेजर, पोहवा. मंगर मेजर, चालक मपोशि. पल्लवी नरवटे यांनी केलेली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular