Organized Dahihandi and Radhakrishna costume competition at PM Shree Savitribai Phule Higher Primary and Secondary School
चंद्रपूर :- पीएम श्री सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी आणि राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक नित सर यांच्या मार्गदर्शनात व सर्व शिक्षकांच्या सहकार्याने या दोन्ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या. Dahihandi and Radhakrishna costume competition >> युवक काँग्रेस च्या वतीने राज्य सरकार व कंगना रानौत चा निषेध
दहीहंडी स्पर्धेत मुलींनी विजय मिळवला. वर्ग दहावीच्या विद्यार्थिनींनी विजयी दहीहंडी फोडत पहिला क्रमांक पटकावीला, त्यांना शाळेचे मुख्याध्यापक नित सर यांच्या हस्ते रोख 701 रुपयांचे बक्षीस देण्यात आले.>> चंद्रपूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी निलंबीत
तसेच, वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांना रोख 501 रुपये, वर्ग सातवीच्या मुलींना प्रोत्साहनपर 301 रुपये आणि वर्ग सहावीच्या मुलांना रोख 301 रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. PM Shree Savitribai Phule Higher Primary and Secondary School
राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धेत नर्सरी ते वर्ग चार पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या स्पर्धेत प्रत्येक वर्गातील तीन विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचा समारोप गोपाळकाला देऊन करण्यात आला.
शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि सर्वांनी एकत्रितपणे हा आनंद सोहळा साजरा करण्यात आला.