Monday, March 17, 2025
HomeLoksabha Electionघराच्या स्लॅबवर बसून धानोरकरांचे भाषण ऐकण्यासाठी झुंबड

घराच्या स्लॅबवर बसून धानोरकरांचे भाषण ऐकण्यासाठी झुंबड

crowd sits on the slab of the house to listen to the Dhanorkar’s speech

चंद्रपूर : चंद्रपुरात एकीकडे सूर्यदेव तापू लागला आहे. लोकसभा निवडणूकीमुळे या तापमाणात यात अधिकची भर पडल्याचे चित्र आहे. चौका-चौकात, नाक्या-नाक्यावर मतदानाची बेरीज – वजाबाकी करताना मतदार दिसत आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात महायुती, महाआघाडीत थेट लढतीचे चित्र आहे. मात्र प्रचारात प्रतिभा धानोरकरांनी आघाडी घेतली आहे.

आज वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात धानोरकरांनी दौरा केला. या दौऱ्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. विशेष करून कॉर्नर सभा, मोठ्या सभांमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सभा मंडपात बसायला जागा मिळाली नसताना घराच्या स्लॅबवर बसून धानोरकर यांचे भाषण ऐकायला नागरिकांनी गर्दी केली होती.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात निवडणूकीचे वातावरण तापले आहे. या तापलेल्या वातावरणात प्रतिभा धानोरकर यांनी गावभेटीचा धडाका लावला आहे. वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील डोंगरगाव, नंदोरी, कोंढा, माजरी वस्ती, कुचना, पाटाळा, घोडपेठ, तांडा, मांगरी, बेलगाव, पावना राय, सागरा, चोरा, वडेगाव, गूळगाव, वायगाव, आष्टा, शेगाव खुर्द, चंदनखेडा या गावात डोर टू डोर धानोरकर यांनी भेटी घेतल्या. या गावभेटीत गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

संतोष तुराणकर, प्रफुल डोंगरे, भानुदास ढवस, शरद खामनकर, महेश मोरे, संजूभाऊ पोडे, दत्तात्रय महातळे, पांडूभाऊ आगलावे, गुड्डू एकरे, चंदू दानव,अशोकराव येरगुडे, प्रदीप घगी, मंगेश मत्ते, प्रफुल येवले, गजानन बांदुरकर, शैलेश चौधरी, मधुकर कुरेकर, चांगदेव रोडे, किशोर पडावे, महेश श्रिसागर, मोहित लबाने, सुमित मुडेवार, अनिल चौधरी, सुनील आगलावे, नरेशभाऊ हेलवटे, सुनील तेलंग, घनश्याम उताणे, राजू डोंगे उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी धानोरकर यांचे जोरदार स्वागत केले. प्रतिभा धानोरकर यांनी जनतेशी जिव्हाळयाने संवाद साधला.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular