Crop insurance has not been received: Bhushan Phuse’s protest warning
चंद्रपूर :- सरकारनं मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांसाठी एक रूपयांत विमा जाहीर केला. पण शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईत फरक पडलेला नाही. चंद्रपूर जिल्हातील अनेक गावांत शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला मिळाला नाही. शेतीमालाला भाव नाही, नैसर्गिक आपत्ती, आणि त्यातही सरकार आणि विमा कंपन्यांनी बळीराजाची अशी थट्टा लावली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
दरम्यान सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्याकडे गोंडपिपरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी तक्रार केली.
फुसे यांनी शेतकऱ्यांना सोबत तालुका कृषी कार्यालय गाठले. अधिकाऱ्यांना जाब विचारला. पिक विमा योजनेची रक्कम त्वरित जमा करावी अशी मागणी फुसे यांनी निवेदनातून केली आहे.
मागणी मंजूर न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा फुसे यांनी दिला आहे.