Crime, Visapur murder solved in 24 hours; The local crime branch arrested the accused
चंद्रपूर :- बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील सचिन भाऊजी वंगणे, वय 40 वर्ष या व्यक्तीची अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने पोटावर वार करून निर्घृण हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने LCB Chandrapur कौशल्यपूर्ण तपास करीत अवघ्या 24 तासात आरोपी विठ्ठल उर्फ डेनी गोसाईराव डबरे याला अटक करण्यात आली. Crime News
बल्लारपूर पोलीस स्टेशन Ballarpur Police Station हद्दीतील विसापूर येथील वार्ड क्रमांक 1 येथील रहिवासी सचिन भाऊजी वंगणे या इसमाची दिनांक 23 जानेवारी रोजी अज्ञात मारेकऱ्यानी Murder हत्या केल्याची तक्रार बल्लारपूर पोलीस ठाण्यात प्राप्त झाली यावरून बल्लारपूर पोलीस पथक घटनास्थळी दाखल होत पाहणी केली असता मृतकाच्या पोटावर अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे निदर्शनास आले यावरून बल्लारपूर पोलीस ठाण्यात कलम 302, 452 भांदवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. Brutal murder
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधिक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधिक्षक सा. व उप विभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांनी तात्काळ गुन्ह्याचे घटनास्थळाला भेट देवून सदर घटनास्थळी तळ ठोकुन गुन्ह्याचे संबंधाने उपयुक्त मार्गदर्शन करून बल्लारपूर पोलीस स्टेशन व स्थानीक गुन्हे शाखा चंद्रपुर असे दोन पथक तयार केले. पोलीस अधिक्षक व अप्पर पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पो.ठाणे बल्लारपूर व स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीबाबत कोणताही सुगावा नसताना अतिशय कौशल्यपुर्ण तपास करून आरोपीबाबत गोपनीय माहिती काढुन 24 तासाचे आंत आरोपी यास निष्पन्न करून आरोपी विठ्ठल उर्फ डेनी गोसाईराव डबरे, वय 37 वर्ष रा. वार्ड क्र 01, विसापुर यास ताब्यात घेवुन अटक करण्यात आली.
सदर कामगिरी पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, उप विभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश पाटील, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार (स्थागुशा), सपोनी रमेश तळी, सपोनी विकास गायकवाड (स्थागुशा), सपोनी प्राची राजुरकर, पोउपनि वर्षा नैताम, पो.हवा रनविजय ठाकुर, यशवंत कुमरे, बाबा नैताम, संतोष दंडेवार, अनुप डांगे, मिलींद चव्हान, जमीर पठान, नितेश महात्मे (स्थागुशा), श्रीनीवास वाभीटकर, प्रसंनजित डोर्लीकर, प्रकाश मडावी, प्रसाद धुलगंडे यांनी केली.