Create independent state of Vidarbha, or fast to death from 15th August
Rajura’s musky couple will fast to death in an iron cage
चंद्रपूर :- विदर्भ प्रेमी संघटनांचे शोभा मस्की व बाबा मस्की 11 ऑगस्ट रविवार पासून लोखंडी पिंजऱ्यात स्वतःला कोंडून महाराष्ट्र राज्य अन्याय करीत आहे असे प्रतितात्मक निषेध आंदोलन करणार आणि येत्या 15 ऑगस्ट पासून शोभा मस्की या लोखंडी पिंजऱ्यात स्वतःला कोंडून संविधान चौक नागपूर येथे अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी राजुरा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. Create independent state of Vidarbha, or fast to death
बाबाराव मस्के विदर्भप्रेमी यांनी आपले मत व्यक्त करीत मी बाबाराव आणि माझी पत्नी शोभा आम्ही दोघीही 10 ऑगस्ट 2024 पासून प्रतिज्ञा घेणार आहोत की, जोपर्यंत विदर्भ राज्य निर्माण होणार नाही तोपर्यंत ते आपल्या घरी परत जाणार नाहीत व लोखंडी पिंजऱ्यातच वास्तव्य करून विदर्भ भर जनजागृती करणार आहोत. येत्या वर्षात विदर्भ राज्य झालेच पाहिजे, जय विदर्भ पार्टीचे उमेदवार या विधानसभेत राज्यात 62 ही जागा लढवणार आहेत आणि मस्की दाम्पत्य त्यांच्या विजयासाठी विदर्भभर प्रचार प्रसार करणार आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. Rajura’s musky couple will fast to death in an iron cage
पत्रपरिषदेला अरुण केदार, मुकेश मासुरकर, बाबाराव मस्की, शोभा मस्की, गुलाबराव धांडे, श्रीकांत दौलतकर, प्रशांत नकाते, नरेश निमजे, राजेंद्र सतई यांची उपस्थिती होती.