Cow killed in leopard attack in Ballarpur
चंद्रपूर :- बल्लारपूर पेपर मिल गेट क्रमांक 7 जवळील नाग मंदिराच्या मागे बिबट्याने गायीवर हल्ला करून ठार केले. ही बाब गुरुवारी सकाळी उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Leopard Attack
पेपर मिल गेट क्रमांक सात ते पॉवर हाऊस रेल्वे लाईनपर्यंत कंपनीच्या सुरक्षा भिंतीलगत नाला वाहतो, मोठमोठी झाडे-झुडपे असल्याने बिबट्याने या संकुलाला आपले घर बनवले आहे. काही महिन्यांपूर्वी वनविभागाने या संकुलातून एका बिबट्याला पकडून नेले होते. मात्र आता पुन्हा बिबट्याचे दर्शन होत आहे.

तीन-चार दिवसांपूर्वी बिबट्या ने एक शेळी फस्त केल्याची घटना घडली होती आणि काल रात्री बिबट्या ने गाईला मारले.
वनविभागाने Ballarpur Forest Department त्वरित कारवाई करीत बिबट्या चा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.