Saturday, April 20, 2024
HomeCrimeचंद्रपुरात गुन्हेगाराकडून १ देशी कट्टा व २ जीवंत काडतुस जप्त ; स्थानिक...

चंद्रपुरात गुन्हेगाराकडून १ देशी कट्टा व २ जीवंत काडतुस जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

1 country made gun and 2 live cartridges seized from criminals in Chandrapur
Proceedings of Local Crime Branch seized

चंद्रपुर :- जिल्ह्यामध्ये होत असलेल्या अवैध धंदे, अवैध हत्यार बाळगणा-या इसमांची माहिती काढून त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश चंद्रपूरचे नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक श्री. मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू यांनी दिले होते.

त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे LCB पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैधरित्या हत्यार बाळगणाऱ्यांवर माहिती काढून त्यावर कार्यवाही करण्याची मोहीम राबविली. Crime News

सदर मोहिमेदरम्यान पथकाला गोपनिय माहिती मिळाली की, मौजा पडोली येथील डी.एन.आर. ऑफीसचे मागे रेल्वे लाईनजवळ एक इसम आपले कमरेला गावठी देशी कट्टा लावून उभा आहे.

सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि विनोद भुरले त्यांच्या टिमसह तात्काळ रवाना होवून सदर इसमास ताब्यात घेवून त्याची तपासणी केली असता, सदर इसमाच्या कमरेला लागून असलेला एक देशी कट्टा तसेच त्याच्या पँटच्या खिशात देशी कट्यात वापरण्यात येणारे २ नग जीवंत काडतुस मिळून आले. One country made gun and 2 live cartridges
आरोपीचे नाव नौशाद शाहादातुल्ला कुरेशी, वय ३२ वर्ष, धंदा मजुरी, रा. वार्ड नं. २, बैंक ऑफ इंडीयाचे मागे, घुघ्युस, ता. जि. चंद्रपुर असे आहे.

त्याचा क्राईम रेकॉर्ड Crime Record तपासला असता त्याचेवर घुग्गुस, राजुरा व वरोरा पोलीस ठाण्यात अनेक चोरी, जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. तसेच सदरचा इसम हा चोरी, घरफोडी तसेच इतर गुन्ह्यांमध्ये विविध पोलीस स्टेशनमध्ये फरार आहे.

सदर इसमाविरूद्ध पोस्टे पडोली येथे अवैधरित्या शस्त्र बाळगणेबाबत गुन्हा नोंद केला असून सदर इसमास पुढिल तपासकार्याकरिता पोस्टे पडोली यांच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सपोनि बोबडे, सपोनि नागेशकुमार चतरकर, सपोनि. किशोर शेरकी, पोउपनि. विनोद भुरले, पोहवा संजय आतकुलवार, नापोकॉ संतोष येलपुलवार, पोकॉ. गोपाल आतकुलवार, पोकॉ. नितीन रायपुरे यांनी केली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular