Contract worker dies in CSTPS railway accident
चंद्रपूर :- चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन CSTPS मध्ये कंत्राटी कामगार अरुण सातघरे हे रात्र पाळीत काम करीत होते. थर्मल पॉवर स्टेशन मधील कोळसा वाहतूक करणारे रेल्वे ज्या ठिकाणी पलटवले जाते (टिल्पर) त्या ठिकाणी सातघरे यांचा मृतदेह आढळून आला. पहाटेच्या दरम्यान ही घटना कामगारांकडून उघडकीस आली. Contract worker dies in CSTPS railway accident
सातघरे यांचे मृतदेह रेल्वे रुळावर धड वेगळे असून दोन्ही हात छातीवर ठेवले आहे त्यामुळे काम करीत असताना तोल गेला असावा असा कयास कामगारांनी लावला आहे.
अरुण सातघरे हे दुर्गापूर कोंडीत येथे वास्तव्यास होते.
घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, घटनेचा पुढील तपास दुर्गापूर पोलीस स्टेशन करीत आहेत.