159th activity of Constitution Jagar (wake up) concluded at Chandrapur Irrigation Office
चंद्रपूर :- भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान असून त्याचे महत्व जनमाणसांपर्यत पोहोचविण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक सहायक संस्थेच्या वतीने पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे कार्यालयात आज संविधान जागर उपक्रम राबविण्यात आला.
संविधान जागर उपक्रमाला डॉ बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक सहाय्यक संस्था चंद्रपूर चे मुख्य प्रवर्तक अशोक घोटेकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री वऱ्हाडे, इंजि. शेषराव सहारे, शंकरराव वेल्हेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक सहायक संस्था चंद्रपूर च्या माध्यमातून जिल्ह्यात एक हजार ठिकाणी संविधान जागर उपक्रम राबविण्याचा मानस घेतला असून आज दिनांक 10 जुलै 2024 रोजी चंद्रपूर शहरातील पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे कार्यालयाच्या सभागृहात 159 वा संविधान जागर उपक्रम कार्यकारी अभियंता श्री वऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेत राबविण्यात आला.
सदर उपक्रमात अशोक घोटेकर यांनी सर्व उपस्थितांना संविधान प्रास्ताविकेची प्रत वितरित करीत प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले तसेच संविधान जागर उपक्रमाचे महत्व विषद केले.
संविधानिक तरतुदीमुळे सर्वसामान्य, गरीब व सर्व स्तरातील नागरिक सन्मानाने जगू शकते असे स्पष्ट केले.
संविधानाची निर्मिती व संविधानाचे महत्व यावर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक इंजि शेषराव सहारे यांनी महत्वाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डी डी मेश्राम यांनी केले.
यावेळी कार्यकारी अभियंता श्री र. प. वऱ्हाडे, स्नेहल लडके, शा. अ. मेश्राम, के. एस. राजूरकर, एन. ए. भोयर, ए. जे. वाकूडकर, एम व्ही संदोकर, एस डी तागडे, डी डी तेलंग, मिलिंद हस्तक आदी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.