Friday, January 17, 2025
Homeमहाराष्ट्र राज्यसंविधान आपला राष्ट्रीय ग्रंथ - माजी आमदार वामनराव चटप

संविधान आपला राष्ट्रीय ग्रंथ – माजी आमदार वामनराव चटप

Constitution Honors Day Ceremony Completed : Constitution Our National Book – Former MLA Vamanrao Chatap

चंद्रपूर:- महात्मा ज्योतिबा फुले तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती चंद्रपूर आणि अष्टांगिक बौध्द मंडळ तळोधी द्वारा 26 नोव्हेंबर संविधान सन्मान दिन समारोह आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते अविनाश टिपले होते. प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार वामनराव चटप यांनी संविधान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या कष्टाने लिहिले, सर्वांना सामाजिक न्याय, समता, बंधुता दिला म्हणून संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ आहे असे सांगितले.

तसेच प्रा.डॉ. टी.डी.कोसे यांनी संविधान म्हणजे प्रत्येकाच्या विकासाचे मार्गदर्शक आहे असे सांगितले.

दीपक चटप यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या विद्यापीठातून शिक्षण घेऊन आपल्या भारत देशासाठी कार्य केले त्याच विद्यापीठात मला शिक्षण घेता आले बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन मी समाजकार्य करीन असे मार्गदर्शनातून सांगितले.

पी.एम जाधव यांनी चमत्काराचे प्रयोग दाखविले.

यावेळी प्रमुख उपस्थिती माजी उपसभापती मदन पाटील सातपुते, बाखर्डी ग्रा. प.सरपंच अरुण रागीट, तळोधी सरपंच ज्योतीताई जेनेकार, पोलीस पाटील विठ्ठल गोहोकर, बाबाजी मत्ते, ग्रा. पं सदस्य गोरखनाथ लांडगे, कुसुमताई संकुलवार, उपसरपंच रवींद्र कुळमेथे, बंडू फुलझेले, आनंद वनकर, प्रकाश जुलमे, रंजीताताई कुंभारे होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक देवगडे, संचालन अनिल कुंभारे व आभारप्रदर्शन अजित साव यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शत्रुघ्न रायपुरे, त्रिशरण करमनकर, सतीश रायपुरे, इंद्रजित दुर्गे, अविनाश आत्राम, रमेश जुलमे, राहुल रायपुरे, सतीश चांदेकर एकनाथ लांडगे यांनी सहकार्य केले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular