Thursday, February 22, 2024
Homeमहानगरपालिका चंद्रपूरसावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेत संविधान दिन साजरा

सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेत संविधान दिन साजरा

Constitution Day celebrated in Savitribai Phule Higher Primary and Secondary School

चंद्रपूर :- आज दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोज रविवारला सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा मनपा चंद्रपूर येथे संविधान दिन Constitution Day साजरा करण्यात आला.

शाळेचे मुख्याध्यापक तथा प्रशासन अधिकारी नित सर यांच्याव्दारे भारताचे संविधान व संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमा दरम्यान इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी भारताचे संविधान व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबदल भाषणाद्वारे माहिती सांगितली.

इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्त्व समजून सांगणारे कृतीयुक्त गीत सादर केले तसेच कर्तव्य धुपे व कविता ढवरे या विद्यार्थ्यांनी सुंदर असे गीत सादर केले.

शाळेतील सहाय्यक शिक्षक अंबादे सर व सहायक शिक्षिका चीरडे मॅडम यांनी विद्यार्थ्यासमोर संविधानावर आधारित सुंदर गीत सादर केले तसेच सहायक शिक्षक मोहरे सर यांनी संविधान दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजून सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवी ची विद्यार्थिनी भूमिका निखाडे व आभार प्रदर्शन वैष्णवी पचारे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular