Thursday, February 22, 2024
Homeक्रीडा व मनोरंजनबहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे संविधान दिवस व प्रस्ताविकेचे वाचन

बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे संविधान दिवस व प्रस्ताविकेचे वाचन

Constitution Day and reading of preamble by Bahujan Employees Federation of India

चंद्रपूर :- रविवार दिनांक २६ नोव्हेंबरला संविधान दिना Constitution Day निमित्त संपुर्ण महाराष्ट्रात प्रस्तावनेचे जाहीर वाचन करून लोकांमधे संविधानिक मुल्यांबद्दल जनजागृती निर्माण करण्याचा कार्यक्रम बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाच्या BEF माध्यमातून आयोजित केला आहे.

देशात संविधान विरोधी शक्ती वाढत असून त्यांनी देशासमोर मोठे संकट उभे केले आहे. अशा वेळी संविधान मुल्यांवर निष्ठा असलेले भारतीय नागरीक संघटीत होऊन या आव्हानाला तोंड देण्यासाठी पुढे यायला हवेत या भावनेतून साजरा करीत आहोत. भारतीय नागरिक यांच्याशी संवाद साधून हे जनजागृती अभियान राबवित आहेत. गाव, तांडा, प्रत्येक वस्ती, चौक, वाचनालय, शाळा , काँलेज व सर्व प्रकारचे कार्यालय येथे प्रस्ताविकेचे जाहीर वाचन करून संविधान दिन साजरा करणे काळाची गरज आहे. सविंधान दिवस व प्रस्ताविकेचे वाचन ह्या कार्यक्रमाचे बीज भारतीय व महाराष्ट्रात रोपायचे आहे कारण हा जनतेला गुलामीतून मुक्त करणारा उत्सव आहे. सविंधान दिवस व प्रस्ताविकेचे वाचन हा उत्सव जे बांधव घरात साजरा करतील त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येईल. तसेच ज्या संघटना, मंडळे, विहार कमिटी संविधान दिन साजरा करेल त्या संघटनेस प्रशस्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल आपण साजरा केलेल्या संविधान दिनाचा फोटो, आपल्या संघटनेचे नाव, विभाग असे आमच्या पर्यंत पोहचवायचे आहे.
संपर्क
राजकुमार जवादे , राष्ट्रीय अध्यक्ष मोबाईल नंबर
9423417396
डॉ.प्रा.टी.डी.कोसे, राष्ट्रीय संघटन सचिव मोबाईल नंबर
डॉ‌ ‌प्रा.स़ंजय रामटेके ,जिल्ह्याध्यक्ष मोबाईल नंबर 9860889512
स़ंजय खोब्रागडे, जिल्हा सचिव मोबाईल नंबर 9403111002 याचाच एक भाग म्हणून बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया जिल्हा शाखा -चंद्रपूर तर्फे 26 नोव्हेंबरला सकाळी 8.30 वाजता मेन रोड चंद्रपूर येथील संविधान निर्माते परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल तसेच सर्व उपस्थितांसमोर संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे, तरी सर्व संविधान प्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे चंद्रपूर शहर अध्यक्ष संजय साखरे आणि शहर सचिव प्रा.भाऊराव मानकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular