Monday, March 17, 2025
HomeMaharashtraचंद्रपूर जिल्हातील सहाही विधानसभा काँग्रेस लढविणार - जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे.

चंद्रपूर जिल्हातील सहाही विधानसभा काँग्रेस लढविणार – जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे.

Congress will contest all six Vidhan Sabhas in Chandrapur district: Congress District President MLA Subhash Dhote

चंद्रपूर (चंद्रपूर टुडे) :- मुंबई येथे पार पडलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर आणि चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे Congress District President MLA Subhash Dhote यांच्या प्रमुख उपस्थितीत आ. सुभाष धोटे यांनी चंद्रपूर जिल्ह्य़ातील काँग्रेस पक्षाच्या मजबूत स्थितीचा अहवाल सादर केला. Political

जिल्हात मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 6 ही जागा लढविल्या होत्या आणि त्यापैकी तीन जागी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते तर सध्यास्थितीत जिल्हात काँग्रेसला अनुकूल वातावरण असून या सहाही ठिकाणी काँग्रेस पक्ष खूप जास्त मजबूत असल्याने या सहाही विधानसभा काँग्रेसनेच लढवाव्यात अशी भक्कम भुमिका मांडली. Chandrapur Assembly

यावर मंथन होऊन कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्या भुमिकेला हिरवा झेंडा दाखविला आहे. ChandrapurToday

त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्य़ातील सहाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचेच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार हे निश्चित झाले असून जिल्हातील या सहाही विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार आणि काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे यांनी केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular