I am confident of my victory -MVA Congress Candidate Pratibha Dhanorkar’s reaction
चंद्रपूर :- “उद्याचा निकाल हा देशाच्या दृश्टीने अत्यंत महत्वाचा असून देशाला कलाटणी देणारे ठरणार आहे. मी माझ्या विजयाबद्दल आश्वस्त असून जनतेनी सेवा करण्याची संधी दिल्यास संधी चे सोणे करुन चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी मी सदैव कटीबध्द राहील” अशी प्रतिक्रिया चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या महाविकास आघाडी काँग्रेस च्या उमेदवार प्रतिभा धानोरकर MLA Pratibha Dhanorkar यांनी मतमोजणीच्या एक दिवस आधी दिली. Loksabha Election Counting
संपूर्ण देशाचे लक्ष वेधून असणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या दिनांक 4 जून रोजी घोषित होणार आहे, चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर आणी महायुती चे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यात ‘काटे की टक्कर’ ची लढत झाल्याचे चित्र घडले. आता उद्याच्या मतमोजणीनंतरच विजयाचे शिलेदार कोण हे सिद्ध होणार.
प्रतिभा धानोरकर यांची प्रतिक्रिया विजयाचे संकेत असल्याचे दर्शवीत आहे.