Conducting soil and water testing training in Anand Niketan Agricultural College
चंद्रपूर :- महारोगी सेवा समिती व्दारा संचालित तथा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, आनंदवन, वरोरा येथे २७ फेब्रुवारी ते ३ मार्च या दरम्यान माती व पाणी परिक्षण प्रशिक्षण पार पडले. हे प्रशिक्षण “राष्ट्रीय कृषि विस्तार व्यवस्थापन संस्था, हैद्राबाद,” “वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, नागपूर”, “कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, चंद्रपूर” अंतर्गत राबविण्यात आले
सदर प्रशिक्षणाच्या उद्घाटना प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुहास पोतदार, आ. नि. कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य , प्रमुख अतिथी बी.एस. सलामे, जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृदा चाचणी अधिकारी व श्री. मा. कडू गुरुजी, विश्वस्त महारोगी सेवा समिती वरोरा उपस्थित होते. Conducting soil and water testing training in Anand Niketan Agricultural College

या कार्यक्रमा दरम्यान विविध उपक्रम पार पडले श्री राहुल खपणे (बँक व्यवस्थापक, महाराष्ट्र बँक) यांनी विविध सरकारी योजनांना बद्दल माहीती दिली. व त्याच बरोबर कृषी निगडीत उद्योग देखील करावे यासांठी त्यांनी युवकांना प्रेरित केली.
विषय तज्ञ सौ. हर्षदा पोतदार, सौ. सीमा बुरान, श्री. सुशील वाघ सर डॉ. महाजन यांनी मातीचे महत्त्व पटवून दिले व त्याच बरोबर त्याचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल जागरूक करण्यात आले, व त्याच बरोबर माती व पाणीचा नमुना चाचणी, यामध्ये सामू, क्षारता, उपलब्ध नत्र, स्फुरद व पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्य तपासण्यात आले. तसेच जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्दीष्ट म्हणजे ग्रामीण युवकांना कौशल्य प्रदान करने व माती व पाणी यांचे महत्त्व पटवून देणे होते. कार्यक्रमाचा समारोप कृषी अधिकारी मा श्री. वरभे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पोतदार सर व कृषी तंत्र निकेतन प्राचार्य सौ. हर्षदा पोतदार यांच्या हस्ते पार पडला.
या प्रशिक्षणामध्ये एकूण 28 प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
प्रशिक्षणाच्या यशस्वी ते करता प्रयोगशाळा परिचर श्री बबन बिबटे आणि मीना कळसकर यांचे देखील सहकार्य लाभले