Conduct online training for senior category and selection category immediately: MLA Sudhakar Adbale’s request to the State Educational Research and Training Council
चंद्रपूर :- राज्यातील पात्र शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य यांनी 12 / 24 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण तात्काळ आयोजित करावे, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पूणे यांच्याकडे केली आहे.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालये या गटातील पात्र शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य यांनी 12 / 24 वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक प्रशिक्षणासाठी पात्र असताना प्रशिक्षण आयोजित न केल्यामुळे आर्थिक लाभापासून वंचित आहेत. मागील वर्षीसुध्दा हीच परिस्थिती होती. तेव्हा आमदार सुधाकर अडबाले यांनी प्रशिक्षण आयोजित करण्याची मागणी केल्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पूणे कडून प्रशिक्षण आयोजित केल्या गेले व शेकडो शिक्षकांना त्यांचा लाभ झाला होता.
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपविण्यात आलेली आहे. सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसीत करण्यात आलेले आहे. सदर पोर्टलवर पात्र शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य यांना नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी व वरिष्ठ श्रेणी / निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांसाठी तात्काळ प्रशिक्षण आयोजित करावे, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पूणे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.