condolence messages; Major activists of Vidarbha Madhyamik Shikha Sangh lost
चंद्रपूर :- विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे माजी चंद्रपूर जिल्हा कार्यवाह, माजी विभागीय कार्यवाह, माजी बोर्ड मेंबर तथा राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक श्री गजाननराव गावंडे गुरुजी यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले.
श्री. गावंडे गुरुजी हे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे एक खंदे कार्यकर्ते होते. त्यांनी विमाशी संघाच्या चंद्रपूर जिल्हा शाखेच्या स्थापनेपासून विमाशी संघाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ते संघाच्या विभागीय कार्यवाहपदीही कार्यरत होते. त्यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून शिक्षकांच्या हक्कासाठी व कल्याणासाठी अनेक चळवळी उभारल्या.
श्री. गावंडे गुरुजी हे एक उत्कृष्ट शिक्षकही होते. त्यांनी अनेक वर्षे शिक्षक म्हणून कार्य केले. त्यांना त्यांच्या कार्याबद्दल राज्य पुरस्कारही प्राप्त झाला.
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. माझ्या विजयात गुरुजींचा सिंहाचा वाटा होता. Mla Sudhakar Adbale
श्री. गावंडे गुरुजी यांचे निधन विदर्भातील शिक्षकांसाठी एक मोठा धक्का आहे. त्यांच्या निधनाने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ या दुःखात सहभागी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो, हीच प्रार्थना!
– सुधाकर अडबाले
आमदार, नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ