Thursday, February 22, 2024
Homeउद्योगकार्पेट निर्मिती केंद्राला जिल्हाधिका-यांची भेट ; बचत गटाच्या महिलांशी संवाद

कार्पेट निर्मिती केंद्राला जिल्हाधिका-यांची भेट ; बचत गटाच्या महिलांशी संवाद

Collector’s visit to Carpet Manufacturing Centre;  Interaction with women of self-help groups.                                                                चंद्रपूर :- ‘चांदा ते बांदा’ या योजनेअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ, चंद्रपुरद्वारे मूल येथील औद्योगिक वसाहतीत नवतेजस्विनी कार्पेट निर्मिती केंद्राचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. 2200 चौ.मी. क्षेत्रावर नव्यानेच बांधण्यात आलेल्या इमारतीला जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी भेट देऊन पाहणी केली. सोबातच सावली येथील कार्पेट निर्मिती केंद्रालासुध्दा त्यांनी भेट देऊन येथे काम करणा-या महिला बचत गटातील कारागिरांशी संवाद साधला.

काही दिवसातच मुल औद्योगिक वसाहतीत कार्पेट निर्मिती केंद्र सुरू होणार असून येथे अंदाजे 200 महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहेत. बचत गटातील महिला शेतकाम किंवा शेतमजुरी करत होत्या, त्यांना कुशल कारागीर म्हणून यश प्राप्त झाले असून या महिलांसाठी लोकर संशोधन संघ, मुंबई हे तांत्रिक सल्लागार म्हणून कार्य करीत आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळ, चंद्रपुर यांच्याकडे मुल औद्योगिक परिसरात याच ठिकाणी महिलांच्या निवासी प्रशिक्षाणाकरिता महिला बचत भवन बांधकाम प्रस्तावित करण्यात आले आहे.

यावेळी माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदिप काठोळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, तहसीलदार (मूल) रविंद्र होळी, विजय पवार (चंद्रपुर), परिक्षीत पाटील (सावली), लोकर संसोधन संघाचे संचालक शिशीर त्यागी, लेखाधिकारी नरेंद्र बनकर, अमित चवरे व प्रविण बावने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular