Thursday, February 22, 2024
Homeजिल्हाधिकारीएमपीसीबी' च्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस ; 'सीटीपीएस 'च्या जल व वायू...

एमपीसीबी’ च्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस ; ‘सीटीपीएस ‘च्या जल व वायू प्रदूषणाचे प्रकरण

Collector’s Notice to Regional Officers of MPCB;  Water and air pollution case of ‘CTPS’

चंद्रपूर :- महाऔष्णिक वीज केंद्राच्या माध्यमातून होत असलेल्या जल व वायू प्रदूषणासंदर्भातील बाजू मांडण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. परंतु, या गंभीर विषयाला पायदळी तुडवत प्रादेशिक अधिकाऱ्यांनी वारंवार दांडी मारली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी एमपीसीबीचे MPCB Chandrapur प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांना कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाई करण्याची ताकीद दिली आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वर्तुळात चांगली खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील उद्योग व प्रकल्पांच्या माध्यमातून होत असलेल्या प्रदूषणासंदर्भात कारवाई करण्याची जबाबदारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे असून शासनाचे प्रादेशिक कार्यालय चंद्रपुरात आहे. मात्र, या कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून उद्योग आणि प्रकल्प व्यवस्थापनासोबत संगणमत करून दुर्लक्ष केले जाते. परिणामी घातक प्रदूषण जनतेला सोसावे लागत असून, आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. दरम्यान, महाऔष्णिक वीज केंद्रामुळे परिसरातील गावांमध्ये व नदी-नाल्यांमध्ये प्रदूषण होत असल्याने मानवासह जनावरांनाही धोका उद्भवत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आल्या होत्या.

या गंभीर तक्रारींची दखल घेवून जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकही आयोजित केली होती. परंतु, या प्रादेशिक अधिकाऱ्यांचा मुंबईतून कारभार?

चंद्रपूरच्या एमपीसीबी कार्यालयात प्रादेशिक अधिकारी म्हणून काही महिन्यांपूर्वीच तानाजी यादव रूजू झाले. मात्र, या कार्यालयात त्यांचे दर्शन दुर्लभ झाले असून, मुंबईतूनच कारभार केला जात असल्याची चर्चा आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी उद्योग व प्रकल्पांमध्ये मोका चौकशी केल्यानंतर त्याचे अहवाल तयार करून अनेक दिवस धूळखात पडलेले राहतात. परंतु, त्यासंदर्भातील नोटीस अथवा कारवाई केली जात नसल्याचीही चर्चा आहे. या पूर्वीसुद्धा एका प्रकरणात सुनावणीकरिता प्रादेशिक अधिकारी यादव अनुपस्थित राहीले होते. त्यावेळी २५ ऑगस्ट रोजी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांकडून वारंवार नोटीस दिले जात असतानाही प्रादेशिक अधिकारी त्यांच्या नोटीसलाही जुमानत नसल्याचे यावरून दिसून येत आहे. यामुळे कामात अक्षम्य दुर्लक्ष केल्या प्रकरणी प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

बैठकीत प्रदूषण नियंत्रण मंडळाची बाजू मांडण्यासाठी प्रमुख अधिकारी म्हणून प्रादेशिक अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे गरजेचे असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय अनुपस्थित राहिले. त्यांच्याकडून अधिनस्त अधिकाऱ्याला बैठकीला पाठविल्यानंतर त्यांच्याकडे योग्य माहितीसुद्धा उपलब्ध नसल्याने या गंभीर विषयावर तोडगा निघू शकला

महाऔष्णिक वीज केंद्राच्या माध्यमातून होत असलेले जल आणि वायू प्रदूषणाचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडून गांभीयनि घेतला जात आहे. परिणामी परिसरातील ‘एमपीसीबी’ च्या प्रादेशिक… नागरिकांवर विपरीत परिणाम होत आहे.

जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी या विषयाला गांभीर्याने घेत बैठक बोलाविली. या बैठकीत शासनाची यंत्रणा म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून प्रदूषणाची गांभीर्यता व केलेली कारवाई या बैठकीत सांगणे महत्वाचे होते. परंतु, प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांनी वारंवार या बैठकांना दांडी मारल्याने प्रशासकीयदृष्ट्या ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीसमध्ये नमूद केले आहे. सोबतच पूर्वपरवानगी न घेता यादव अनुपस्थित राहीले असून त्यांना या प्रकरणात स्पष्टीकरणही मागण्यात आले आहे. विहीत वेळेत स्पष्टीकरण न दिल्यास कारवाई करण्याची ताकीद देण्यात आली असल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular