Sunday, December 8, 2024
HomeMaharashtraसीएमपीएल वोल्वो ऑपरेटर कामगारांचे आज बेमुदत धरणे आंदोलन
spot_img
spot_img

सीएमपीएल वोल्वो ऑपरेटर कामगारांचे आज बेमुदत धरणे आंदोलन

CMPL Volvo operator workers to go on indefinite strike today

चंद्रपूर :- सीएमपीएल माती उतखन कंपनी CMPL Company चे पवनी साखरी वेकोली WCL एरियातील काम संपल्याचे कारण समोर करून कंपनीने येथील सर्व स्थानिक कामगारांना दुसऱ्याठिकाणी काम मिळाल्यावर कामावर घेण्यात येईल असे पत्राद्वारे कळवून वाल्वो ऑपरेटर कामगारांना कामावरून कमी केले. सीएमपीएल कंपनीला सास्ती वेकोली WCL एरियात नवीन काम मिळाल्याचे कामगारांना कळताच कामगारांनी दिनांक 22 मे 2024 रोजी कंपनीला सास्ती येथे स्थलांतरीत करून घेण्यासाठी निवेदन दिले, 24 मे पर्यंत कामावर घ्या अन्यथा कंपनी विरोधात धरणे आंदोलनाचा इशारा कामगारांनी दिला होता त्यानुसार कामगारांनी कंपनी विरोधात 25 मे रोजी धरणे आंदोलन केले परंतु कंपनी प्रशासनाने स्थानिक कामगारांना कामावर रुजू केले नाही करिता आज 10 जून रोजी राजुरा तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा ईशारा अनैशा वाहन चालक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

सीएमपीएल माती उत्तखन कंपनी चे साखरी पवनी वेकोली परिसरातील माती उतखननाचे कार्य संपूष्ठात आल्याने येथे कामावर असणाऱ्या सर्व स्थानिक कामगारांना कामावरून कमी करण्यात आले यावरून कामगारांवर आणी त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली, परिणामी कंपनीला सास्ती वेकोली येथे परत माती उतखननाचे काम मिळाल्याने स्थानिक पवनी, साखरी, गोवरी येथील कामगारांना सास्ती येथे स्थलांतरित करीत पूर्ववत कामावर घ्यावे अशी मागणी कामगारांनी कंपनी प्रशासनाला करण्यात आली त्यानंतर कंपनी विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन सुद्धा करण्यात आले, आंदोलना दरम्यान कामगारांना पोलीस प्रशासनाने अटक करून सुटका केली परंतु कंपनी प्रशासनाने कामगारांची दखल घेतली नाही

.

करिता अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या नेतृत्वात कामगार आणी त्यांच्या परिवाराला घेऊन आज दिनांक 10 जून 2024 रोजी राजुरा तहसील कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार, तरीही न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा ईशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

सदर मागणीचे निवेदन नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी राजुरा, वेकोली व्यवस्थापक सास्ती, तहसीलदार राजुरा व पोलीस निरीक्षक राजुरा यांना देण्यात आले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular