Cleanliness campaign conducted by Hansraj Ahir in Hinglaj Bhawani Temple ; Enthusiastic participation of BJP workers and citizens
चंद्रपूर :- दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत प्रभु श्रीरामचंद्रांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असून या महासोहळ्याच्या पार्श्वभुमीवर देशभरातील सर्व मंदीरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन प्रधानमंत्री माननिय नरेंद्र मोदी जी Narendra Modi यांनी केले असल्याने दि. 14 जानेवारी रोजी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर Hansraj Ahir यांनी चंद्रपूर शहरातील बाबुपेठ येथील माता हिंग्लाज भवानी मंदीरात मातेचे दर्शन व पुजा अर्चना करुन मंदीर परिसरात स्वच्छता मोहीम राबविली.

या स्वच्छता मोहीमेमध्ये या परिसरातील माजी नगरसेवक प्रदीप किरमे, माजी नगरसेविका कल्पनाताई बगुलकर, पंडीत मथुराप्रसाद पांडे, दशरथ सोनकुसरे, बाथोताई, रेखाताई चन्ने, संजय मिसलवार, आकाश पिसे, सुदामा यादव, पडवेकर ताई, मंदीराचे पुजारी संतोष जाधव, शालुताई कन्नोजवार, रेखाताई पाटील, पार्वताबाई आंबिलकर, वंदना कंदीकुरवार, वासंती मेडसिंगे, मिना पारपल्लीवार, इंगोले ताई, सावरकर ताई, नंदुरकर ताई व परिसरातील शेकडो नागरिक या स्वच्छता मोहीमेत सहभागी झाले होते.
यावेळी हंसराज अहीर यांनी उपस्थितांना तसेच शहारातील विविध मंदीर परिसरात नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने स्वच्छता मोहीम राबवावी असे आवाहन केले.