Thursday, September 12, 2024
spot_img
spot_img
HomeAccidentपेट्रोल पंपाला 34 गावातील नागरीकांचा विरोध :

पेट्रोल पंपाला 34 गावातील नागरीकांचा विरोध :

Citizens of 34 villages protest against petrol pump near tribal ashram school
Intense agitation if petrol pumps are allowed
Warning of Chandrapur district tribal organization in letter conference

चंद्रपुर :- कोरपना तालुक्यातील स्व. भाऊराव पाटिल चटप आदिवासी आश्रम शाळा व स्व. संगीता चटप उच्च माध्यमिक विद्यालयात परीसरातील हजारों आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत, याच शाळेच्या अंदाजे 150 मीटर अंतरावर नवीन पेट्रोल पंप चे काम सुरू केले आहे. भविष्यात उक्त पेट्रोल पंपापासून शालेय विध्यार्थ्यांना होणारा संभावीत धोका लक्षात घेत कोरपना तालुक्यातील 34 गांवातील 3500 नागरीकांनी सहीनीशी जिल्हाधिकारी यांचे कडे आक्षेप अर्ज दाखल केले आहेत. पेट्रोल पंपाला संमती नाकारण्यात यावी अन्यथा चंद्रपुर जिला आदिवासी संघटनेकडुन प्रस्तावित पेट्रोल पंप जागेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा आदिवासी संघटनेचे संजय खुशाल सोयाम, जितेश कुळमेथे यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिला आहे. Citizens of 34 villages protest against petrol pumps

कोरपना तालुक्यात स्व. भाऊराव पा. चटप आदिवासी आश्रम शाळा व स्व. संगीता चटप उच्च माध्यमिक विद्यालय ही मोठी व सर्वसुविधाजनक शाळा असुन परीसरातील विद्यार्थ्याना याचा फायदा होत आहे. परंतु याच दरम्यान आश्रमशाळेच्या परीसरातील 150 मीटर आत शाळेसमोर पेट्रोल पंप चे काम सुरू झाले आहे. भविष्यात मुलांना हानी पोहचु शकते, विद्यार्थ्याच्या अभ्यासावर परिणाम होऊ शकतो, प्रस्तावित पेट्रोल पम्पाला लागून असलेल्या पश्चिमेकडील वस्तीगृहात 1 ते 12वी पर्यंतचे आदिवासी, ओबीसी व अन्य विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात आदिवासी विद्यार्थ्याची संख्या अधिक आहे.

आश्रम शाळेतील वस्तीगृहात 500 ते 600 विद्यार्थी निवासीत आहे. या ठिकाणी पहली ते बारावी पर्यंत अंदाजे 900 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या सर्व बाबीवर विचार करून त्या ठिकाणी होणारे प्रस्तावित पेट्रोल पंपाला वाणिज्य प्रयोजनाकरीता अकृषक अर्जावर परवानगी देने आदिवासींच्या मुलांवर अन्याय करण्यासारखा आहे. शाळा, विद्यालय, वस्तीगृह हे सार्वजनिक ठिकाणी असुन या परीसरात पेट्रोल पम्पाची परवानगी देने उचीत नाही अशी माहीती संजय सोयाम यांनी दिली.

भविष्यात पेट्रेाल पंप पासून स्फोट व रात्र दिवस चालणारी वाहने यामुळे विद्यार्थ्याना ध्वनी प्रदुषणाचा धोका उद्भवु शकतो. या पेट्रोल पम्पाला कोरपना तालुक्यातील 34 गांव कोरपना, कुकूडबोडी, शिवापूर, दुर्गाडी, कोठोडा, पांडवगुडा, मांडवा, येरगव्हाण, चनई बु, चनई खु., खडकी, बोरगांव खु. कन्हालगांव, मांडवा, जांभुलधरा, कढोली, नारंडा, वडगांव, रामपुर, येलगांव, इंजापुर, गडचांदुर, निजामगोंदी, खिर्डी, सोनुर्ली, वनसडी, जेवरा, सावलहिरा, खैरगांव, धानोली, कुसळ, पिपर्डा, चिंचोल गांवातील पालकांनी आक्षेप घेतला आहे. या पालकांच्या विद्यार्थ्याच्या भवितव्याचा विचार करून मौजा कोरपना सर्वे क्रमांक 30/4/अ/1 आराजी 0.35 हे. आर. जमीन वाणिज्य पेट्रोल पम्प करीता अकृषण प्रयोजनार्थ आलेला अर्ज रद्द करण्याची मागणी आदिवासी समाजाने जिलाधिकारी यांचे कडे केली आहे.

ही मागणी मंजूर न झाल्यास प्रस्तावित पेट्रोल पंपच्या समोर पालक, विद्यार्थी व अन्य समाज बांधवांसोबत तिव्र आंदोलन करण्याचा इशारा चंद्रपुर जिला आदिवासी संगटने चे संजय सोयाम, जितेश कुळमेथे यांनी दिला आहे.

पत्रपरिषदेला संजय खुशाल सोयाम, बंडु कुमरे, सुधाकर कुसराम, जितेश कुलमेथे, मंगेश सोयाम, प्रविण मडचापे, मंगेश पंधरे आदि उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular