Sunday, March 23, 2025
HomeMaharashtraमुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना : पहिल्या टप्प्यात अर्ज करण्याची अंतिम...

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना : पहिल्या टप्प्यात अर्ज करण्याची अंतिम मुदत

Chief Minister’s ‘Maji Ladki Bahin Scheme’

  Deadline to apply for the first stage

चंद्रपूर :- राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ My Beloved Sister Scheme सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिला / मुलींना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहे. योजनेची सुरूवात 1 जुलै पासून करण्यात आली असून पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2024 पर्यंत आहे. त्यानंतरही योजना सुरू राहील, असे महिला व बालविकास कार्यालयाने कळविले आहे.

योजनेचा उद्देश : 1) राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, 2 ) त्यांचे आर्थिक – सामाजिक पुनर्वसन करणे, महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे, 3) महिला व मुलींच्या सशक्तीकरणास चालना मिळणे, 4) महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे.

लाभार्थी पात्रता : 1) वय 21 ते 60 वर्षे असणारी महिला. 2) महाराष्ट्र राज्याची रहिवासी महिला. 3) विवाहित, विधवा, घटस्फोटित परित्यक्त्या, निराधार महिला. 4) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लक्ष पेक्षा कमी असणे गरजेचे.

अपात्रता : 1) कुटुंबातील सदस्य आयकरदाता असल्यास, 2) सरकारी नोकरी, 3) आजी/माजी आमदार/खासदार 4) कुटुंबाच्या मालकीची 5 एकर पेक्षा जास्त जमीन असणारे, 6) चार चाकी गाडी असणारे.

अर्ज करण्याची पद्धत :अर्ज नि:शुल्क अंगणवाडी सेविका यांचेकडे भारता येईल. अर्ज विहित नमुन्यात भरून व त्याला आवश्यक कागद जोडून अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सेतू केंद्र, वार्ड अधिकारी यांना देता येईल. वरील सर्वांकडून अर्ज ऑनलाईन भरून घेता येईल.

आवश्यक कागदपत्रे : योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्याचे आधारकार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र / महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपर्यंत असावे), बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

अडचणी असल्यास येथे करा संपर्क : अर्ज भरतांना काही समस्या असल्यास जिल्हा स्तरावर सुविधा केंद्र स्थापन केले आहे. त्यासाठी संपर्क क्रमांक 7972059274 तसेच महिला हेल्प लाईन 181 वर संपर्क करता येईल.

जिल्हाधिका-यांच्या यंत्रणांना सुचना : अर्जासाठी लागणारे उत्पन्न दाखले तसेच रहिवासी प्रमाणपत्रे तयार करण्यासाठी विविध पातळीवर नगरपालिका मुख्याधिकारी, महानगरपालिका अधिकारी, तहसीलदार यांनी कॅम्प आयोजित करून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. तसेच मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिल्याचे महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी कळविले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular