Chhatrapati Shivaji Maharaj’s work strengthening democracy – MLA Kishore Jorgewar performed Shivaji Maharaj’s aarti
चंद्रपूर :- शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले शिवरायां नंतरही अनेक राजे उदयास आले. पण सर्वात लोकप्रीय व आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखले जाते. त्यांचे स्वराज्य बद्दल असणारे प्रेम, निष्ठा, पराक्रम व निष्कलंक चारित्र्य, शेतकर्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये. असा आदेश सेनेला देत शेतकऱ्यांचा हिताचा विचार करणारे महाराज हे प्रजादक्ष राजे होते. त्यांचे कार्य लोकशाहीला बळ देणारे असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
चंद्रपूर जिल्ह्यात सांस्कृतिक कार्य विभाग, महासंस्कृती व चंद्रपूर जिल्हा प्रशासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित महानाट्य “जाणता राजा” Jaanata Raja महानाट्य चे प्रयोग दिनांक ०२ ते ०५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान चांदा क्लब ग्राउंड, येथे आयोजित करण्यात आले आहे. Chhatrapati Shivaji Maharaj’s work strengthening democracy – MLA Kishore Jorgewar performed Shivaji Maharaj’s aarti
दरम्यान सदर महानाट्याच्या दुस-या दिवशी आमदार किशोर जोरगेवार यांची प्रमूख उपस्थिती होती. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त विपिन पालिवाल, तहसिलदार विजय पवार, उपायुक्त खवले, माता महाकाली महोत्सव समितीचे सचिव अजय जयस्वाल, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, सूर्यकांत खनके, यांच्यासह इतर मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, शिव छत्रपती महाराज आमचे आराध्य आहे. त्यांच्या जिवणकार्यावर आधारीत नाट्य प्रयोगाचा नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित राहत लाभ घेत आहे. मात्र प्रशासनाने येणा-या नागरिकांना परत पाठवू नये. त्यांना नाट्य प्रयोग पाहात येईल यासाठी त्यांची व्यवस्था करावी असे ते यावेळी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात हुकुमशाही नव्हती. ते रयतेचे राज्य होते. पून्हा आपल्याला शिव छत्रपती महाराज यांच्या विचारांचे अनुसरण करुन रयतेचे राज्य स्थापन करण्याची गरज आहे. जगातील पहिल्या लोकशाहीचा प्रयोग कदाचित शिवाजी महाराज यांच्या कार्य काळात झाला असावा असे ते यावेळी म्हणाले.
आज चंद्रपूरात सलग चार दिवस सदर नाट्य प्रयोग सादर केल्या जाणार आहे. या नाट्य प्रयोगाच्या माध्यमातून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांची लोकहिताची कार्यप्रणाली अनुभवता येणार आहे. त्याकाळी स्वराज्य निमिर्तीसाठी त्यांनी केलेल्या संघर्षाचा इतिहास दर्शविणारे हे नाट्य आहे. एका नव्या उर्जेचा संसार यातून होणार असल्याचे यावेळी ते म्हणाले.
या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार व माता महाकाली महोत्सव समीतीच्या वतीने सदर महानाट्यातील कलाकारांचा माता महाकालीची मुर्ती देत सन्मान करण्यात आला. सदर नाट्य प्रयोग पहाण्यासाठी हजारो नागरिकांची उपस्थिती होती.