Chandrapur skaters won 15 international medals
चंद्रपूर :- शहरातील 5 स्केटर्सनी आंतरराष्ट्रीय एण्ड्युरन्स स्पर्धेत 15 आंतरराष्ट्रीय पदके जिंकून जागतिक दर्जावर चंद्रपूरचे नाव कोरले आहे.
भारत, श्रीलंका, यूएई, मालदीव आणि केनिया या पाच देशांच्या सहभागासह आंतरराष्ट्रीय एण्ड्युरन्स चॅलेंज 18,19 नोव्हेंबर 2023 स्पर्धा नुकतीच याक पब्लिक स्कूल, खोपोली, मुंबई येथे पार पडली. Chandrapur skaters won 15 international medals
इंडियन एण्ड्युरन्स फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने एण्ड्युरन्स वर्ल्ड फेडरेशनने ही स्पर्धा आयोजित केली होती.
भारत, श्रीलंका, मालदीव आणि केनिया या देशांतील सुमारे 500 स्केटर सहभागी झाले होते. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अमेया स्केटिंग स्केटिंग अकादमीच्या Ameya Skating Academy चंद्रपूरच्या स्केटर्सची टीम इंडियामध्ये निवड झाली होती.
भारतीय संघामध्ये अमेया स्केटिंग अकादमीच्या समीर धुर्वे, ध्येय वरफडे, रुद्र कुलमेथे, भास्कर रॉय, वैभव धुर्वे, ओझैर रहमान, रिषभ देहरिया, आमीन शेख, रेशम फुलसंगे, श्राव्य घोडमारे, आरुष नागपुरे, साहिती वाढई यांची निवड झाली होती.
दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय एण्ड्युरन्स स्पर्धेच्या पहिल्या दिवशी या स्केटर्स खेळाडूंनी देशासाठी 10 पदके आणि दुसऱ्या दिवशी 5 पदके अशी 15 पदके मिळवून मोठे यश संपादन केले. यात 15 कांस्यपदकांचा समावेश आहे.
पदक तालिकेत श्रीलंका दुसऱ्या स्थानी, तर मालदीवचा संघ तिसऱ्या स्थानावर राहिला. केनिया संघ चौथ्या, तर मालदीवचा संघ पाचव्या क्रमांकावर होता.
या आंतरराष्ट्रीय कामगिरीबद्दल विजेते स्केटर्स आणि प्रशिक्षक आतिष धुर्वे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.