Chandrapur Lok Sabha constituency. Polling was done by the Collector, Groom did the voting
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ क्र. 13 क्षेत्रात निवडणुकीकरीता सकाळी 7 ते 11 या वेळेत 18.94 टक्के जागरूक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. Chandrapur Loksabha Election यात राजूरा विधानसभा क्षेत्रात 21.40 टक्के, चंद्रपूर 19.03 टक्के, बल्लारपूर 20.10 टक्के, वरोरा 17.65 टक्के, वणी 19.96 टक्के आणि आर्णि विधानसभा मतदारसंघात 15.50 टक्के मतदान झाले आहे.
मतदारात लोकसभा निवडणुकीला घेऊन मोठा उत्साह दिसत असल्याचे निदर्शनास आले आहे.
चंद्रपूरचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सहपरीवार, चंद्रपूर येथे मतदान केंद्रावर रांगेत उभे राहून आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
चंद्रपूर तालुक्यातील पिपरी (धानोरा) येथील गणेश पाटील यांनी आज त्यांच्या लग्नाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावला आणि चंद्रपूर येथील लग्नाकरिता वरातीसह निघाले.