Chandrapur District Youth Congress District President Shantanu Dhote’s birthday in excitement: 71 blood donors donated blood
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु अजय धोटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त श्री राम मंदिर राजुरा येथे भव्य रक्तदान शिबीर पार पडले.

यामध्ये ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या प्रसंगी युवक काँग्रेसच्या विविध शाखेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना मोफत नोटबुक चे वितरण करण्यात आले.
रक्तदान शिबीराचे उद्घाटन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, निर्मला कुडमेथे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, माजी सभापती कुंदाताई जेनेकर, कार्याध्यक्ष एजाज अहमद, पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, सभापती विकास देवाळकर, अभिजित धोटे, मंगेश गुरनुले, वसंता ताजने, उमेश गोरे, ज्योतीताई शेंडे, कविता उपरे, पूनम गिरसावळे, इंदूबाई निकोडे, यु. काँ. तालुकाध्यक्ष इर्षाद शेख, शहराध्यक्ष रामेश्वर ढवस, अशोक राव, जिल्हा महासचिव प्रणय लांडे, आकाश मावलीकर, मुन्ना माशिरकर, सय्यद साबिर, विक्रम ठाकूर, शुभम खेडेकर, दिपक खेकारे, रोशन मरापे, खुशाल लोनगाडगे, संदीप घोटेकर, यश मोरे, दिपक वाभिटकर, महाविर खटोल, गोलू डुकरे, मारोती पाचपुते, सचिन वैद्य, शंकर तोडासे यासह युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. रक्तदान शिबीरासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेचे कर्मचारी पंकज पवार, अमोल जिद्देवार, डॉ. अश्विन, रूपेश डहाळे, उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील सावी मानकर यांनी सहकार्य केले.