Thursday, February 22, 2024
HomeCrimeउच्चशिक्षित तरुणाची शहरात दोन घरफोड्या ; एलसीबी ची आरोपीला दागिन्यांसह अटक

उच्चशिक्षित तरुणाची शहरात दोन घरफोड्या ; एलसीबी ची आरोपीला दागिन्यांसह अटक

Chandrapur Crime News ; Two house burglaries of a highly educated youth in the chandrapur city;  LCB arrests accused with jewellery

चंद्रपूर :- शहरात घरफोडी, चोरी च्या घटना दिवसेंदिवस वाढत असतांना स्थानीक गुन्हे शाखेने सापळा रचून सराईत, उच्चशिक्षित चोराला अटक केली असून चोरलेले सोने चांदीचे दागिने असा एकूण 77,455 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. Burglarie

मागील काही दिवसापासुन चंद्रपुर शहरात घरफोडीचे प्रमाण वाढल्याने अशा गुन्हयांना आळा घालण्याकरिता पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला Local Crime Branch Chandrapur विशेष निर्देश दिले, या निर्देशानुसार पोलीस निरिक्षक महेश कोंडावार स्थागुशा चंद्रपुर यांनी एक विशेष पथक नेमुन त्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी अनेक दिवसापासुन सापळा रचला दिनांक 12 जानेवारी रोजी गोपनिय माहिती मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील घरफोडीचा गुन्हेगार आशिष श्रीनिवास रेडडीमल्ला, वय 24 वर्ष, रा. स्यत्तवारी कॉलरी, डिस्पेन्सरी चौक, चंद्रपूर यानी लालपेठ कॉलरी चंद्रपूर येथील घरफोडी करून तो स्यत्तवारी कॉलरी परिसरात संशयास्पदरित्या फिरत आहे. Chandrapur Today, Crime News

अशा माहीतीवरून त्याला ताब्यात घेत सखोल चौकशी व पोलिसीखाक्या दाखविली असता त्याने श्रीनगर कॉलनी, लालपेठ तसेच बाबुपेठ येथे घरफोडी केल्याची कबुली दिली.

दोन्ही ठिकाणी घरफोडी करून चोरी केलेले सोन्याचा (पिवळया धातुचे) गळयातील नेकलेस, कानातील सोन्याचे दोन टॉप्स असा एकुण 77455/- रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला.

आरोपी कडुन पोस्टे चंद्रपूर शहर येथे गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. नमुद आरोपी हा उच्चशिक्षीत असुन त्याचेवर यापूर्वी पोस्टे रामनगर येथेही घरफोडीचे गुन्हे दाखल आहे.

सदरची यशस्वी कामगीरी रविंद्रसिंग परदेशी पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पो. नि. महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा, पोउपनि विनोद भुरले, पो. हवा. संजय आतकुलवार, नापोअ संतोष येलपुलवार, पो.अ. नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, तसेच सायबर पथक यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular