Sunday, December 8, 2024
HomeCrimeघरफोडीचा सर्राइत गुन्हेगार पोलीसांच्या ताब्यात
spot_img
spot_img

घरफोडीचा सर्राइत गुन्हेगार पोलीसांच्या ताब्यात

Chandrapur Crime news, Notorious burglar in custody of police

चंद्रपूर :- शहरातील लालपेठ परिसरातील श्रीनगर कॉलोनीत घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील सर्राइत आरोपीला Notorious burglar स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक करीत 1,47,560 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. Crime News

लालपेठ कॉलरी परिसरातील श्रीनगर येथे राहणाऱ्या जयलक्ष्मी बद्रया गाडम वार्डातच राहणाऱ्या आपल्या आईच्या घरी झोपायला जातांना आपल्या घराच्या दरवाजाची कुंडी, कुलूप लावून गेल्या दुसऱ्या दिवशी पहाटे 5:30 वाजता येऊन बघतात तर लाकडी दाराची कुंडी तुटून, घरातील अलमारी तपासली असता अलमारीतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण 53,000 रुपयांचा माल चोरी झाल्याचे निदर्शनास आले, यावरून महिलेने चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. Chandrapur City Police Station

घरफोडीची तक्रार प्राप्त होताच पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार गुन्हे अन्वेषण पथकाचे सपोनि मंगेश भोंगाडे आपल्या शोध पथकासह घटनास्थळी दाखल होत शोध सुरू केला.

सदर गुन्ह्याच्या तपासात अज्ञात आरोपीचा शोध घेत असता 13 जानेवारी रोजी स्थानीक गुन्हे शाखाने LCB गुन्हयात चोरी करणारा रेकॉर्ड वरील आरोपी आशीष उर्फ आशु श्रीनिवास रेड्डीमंल्ला, वय 24 वर्ष, रा. डिस्पेन्सरी चौक रयतवारी कॉलरी चंद्रपुर यास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर दाखल गुन्हयात आरोपी कडुन गुन्हयात चोरी गेलेल्या माला पैकी सोन्याचे गळ्यातील नेकलेस 17.850 ग्रॅम किंमत 65,955/-रूपये, सोन्याचे कानातील टॉप्स 3. 120 ग्रॅम कि. अंदाजे 11,500/-रूपये असा एकुण 77,455/-रु. चा माल जप्त करून करून आरोपीस पोलीस स्टेशन चंदपुर शहर यांचे ताब्यात दिले.

चंद्रपुर शहर पोलीसांनी आरोपीची 3 दिवस पोलीस कोठडी घेवुन सदर गुन्हयातील उर्वरित मालाबाबत कसुन विचारपुस केली असता त्याने सदर चोरीचा माल नागपुर येथे ज्वेलर्सचे दुकानात विकल्याचे सांगितले, त्यावरून नागपुर येथे आरोपीसह जावुन गुन्हातील सोन्याचे दागीने किमंत 39,900/- सोन्याचे दागीने किमंत 1,07,660/-रू. असा एकुण 1,47,560/-रू चा माल जप्त करण्यात आला

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सतिशसिह राजपुत यांचे नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पुलिस निरीक्षक मंगेश भोंगाडे, पुलिस उपनिरीक्षक शरीफ शेख सहाय्यक फौजदार विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, जयंता चुनारकर, सचिन बोरकर, संतोष पंडीत, निलेश मुडे, चेतन गज्जलवार, इमरान शेख, रूपेश रणदिवे, दिलीप कुसराम, संतोष कावडे, भावना रामटेके यांनी केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular