Monday, November 11, 2024
Homeक्राईमचंद्रपुरात ब्राऊनशुगर ची विक्री ; शहर पोलिसांची धाड टाकत दोघांना अटक
spot_img
spot_img

चंद्रपुरात ब्राऊनशुगर ची विक्री ; शहर पोलिसांची धाड टाकत दोघांना अटक

Chandrapur Crime News, mpds act, brown sugar in Chandrapur : City police arrested two accuse

चंद्रपूर :- चंद्रपूर शहरात ब्राऊन शुगरची Brown sugar खुलेआम विक्री करणाऱ्या आरोपीला व त्याच्या म्होरक्याला चंद्रपूर शहर पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक करीत 7.12 ग्राम ब्राऊन शुगर, मोबाईल, नगदी रक्कम असा एकूण 57,910 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. Chandrapur Crime News

चंद्रपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत ब्राऊन शुगरची खुलेआम अवैध विक्री होत असल्याची गोपनीय माहिती चंद्रपूर शहर पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली यावरून गुन्हे शोध पथकाचे सपोनि मंगेश भोंगाडे यांनी पोलीस पथक व पंचासमक्ष घटनास्थळी धाड टाकली असता आरोपी सोहेल सलीम वय, 23 वर्ष, शेख, रा. लालपेठ हा ब्राऊन शुगरची विक्री करतांना संशयीतरित्या आढळून आला, त्यावरून त्याला त्याब्यात घेत अंगझडती घेतली असता 7.12 ग्रॅम ब्राऊनशुगर, रुपये शंभरची व एक 10 रुपये असे 110 रुपयांच्या नोटा, एक विवो व एक ओपो कंपनीचा मोबाईल असा एकूण 57,910 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला, पोलीसीखाक्या दाखवीत आरोपीची कसून चौकशी केली असता म्होरक्या आवेश कुरेशी, वय 38 वर्ष, रा. भंगाराम वार्ड, चंद्रपूर याचे करिता विक्री करतो अशी कबुली दिली. Chandrapur City Police Station

शहर पोलीसांनी अपराध एम.डी. पी. एस. अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी सोहेल सलीम शेख व आवेश शब्बीर कुरेशी यांना अटक केली असून 57,910 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागिय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रपुर शहर पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपुत, गुन्हे शोध पथकाचे सपोनि. मंगेश भोंगाडे, सपोनि. रमीझ मुलानी, पोउपनि शरिफ शेख, स.फौ. विलास निकोडे, पो. हवा. महेंद्र बेसरकर, जयंता चुनारकर, संतोष पंडीत, सचिन बोरकर, निलेश मुडे, भावना रामटेके, चेतन गज्जलवार, इम्रान खान, संतोष कावळे, दिलीप कुसराम, ईरशाद शेख, रूपेश रणदिवे, रूपेश पराते यांनी केली .

सदर गुन्हयातील पुढील तपास सपोनि. मंगेश भोंगाडे करीत आहेत.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular