Thursday, April 24, 2025
HomeCrimeअंमली पदार्थ विक्रेत्यावर चंद्रपूर शहर पोलीसांची धाड

अंमली पदार्थ विक्रेत्यावर चंद्रपूर शहर पोलीसांची धाड

Chandrapur city police raid on drug dealer

चंद्रपूर :- चंद्रपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील घुटकाळा वार्डात अमली पदार्थ (गांजा) विक्री करणाऱ्यावर चंद्रपूर शहर पोलिसांनी धाड Police Raid टाकत 1.383 ग्रॅम गांजा जप्त केला यात एकूण 35,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर आरोपी शरीक जलील कुरेशी रा. रहेमत नगर, चंद्रपूर व मोबीन करीम शेख रा. दर्गा वार्ड घुटकाळा यांचेवर एन डी पी एस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. Chandrapur Crime

निवडणुकीचे बिगुल, शहरातील वाढती गुन्हेगारी व अमली पदार्थांची तस्करी या गंभीर विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत चंद्रपूर शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे शहरातील घुटकाळा वार्डात अवैधरित्या अमली पदार्थ गांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर पंचांसमक्ष धाड टाकली असती 1.383 ग्रॅम गांजा अंदाजे किंमत 14,000 रुपये आढळून आला यावरून आरोपीना ताब्यात घेत आरोपीकडून गांजा नगदी 1600 रुपये, दोन्ही आरोपीचे मोबाईल फोन 20,000 रुपये असा एकूण 35,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी शरीक जलील कुरेशी (36 वर्ष) रा. रहेमत नगर, चंद्रपूर व मोबीन करीम शेख (31 वर्ष) रा. दर्गा वार्ड घुटकाळा यांचेवर अंमली पदार्थ विक्री एन डी पी सी अंतर्गत पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे अपराध क्र. ७९५/२०२४ कलम ८ (क), २० (ब),२० (ii) (ब), २९ Ndps act 1985 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Chandrapur city police raid on drug dealer

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक मुमंक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्षनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांचे नेतृत्वात स.पो.नी. निलेश वाघमारे, मंगेश भोंगाडे, पोहवा सचीन बोरकर, संतोष कनकम, पोका ईम्रान खान, रूपेश रणदीवे, दिलीप कुसराम, राहुल चिताडे, ईर्शाद खान यांनी केली आहे.

सदर गुन्हयाचे पुढील तपास पोउपनी संदीप बंच्छीरे पोस्टे चंद्रपुर शहर हे करीत आहेत.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular