Tuesday, November 12, 2024
HomeCrimeचंद्रपूर शहर पोलीसांची बाबुपेठ येथे धाड
spot_img
spot_img

चंद्रपूर शहर पोलीसांची बाबुपेठ येथे धाड

Chandrapur city police raid Babupeth: Banned flavored tobacco seized

चंद्रपूर :- प्रतिबंधित सुंगधित तंबाखु विक्री करीता घरी ठेवला असल्याच्या माहितीवरून चंद्रपूर शहर पोलिसांनी धाड टाकत Police raid 33750 रुपयांचा तंबाखू जप्त करीत तंबाखू तस्कर अरविंद निवलकर याचेवर गुन्हा नोंद करण्यात आला. Crime

आज दिनांक 6 मे रोजी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करीत असतांना गुप्तबातमीदार यांचेकडुन माहिती मिळाली की, बाबुपेठ ब्रिजचे खाली परीसरात राहणारा अरविंद निवलकर याने महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधीत असलेला सुंगधित तंबाखु विक्री करीता घरी ठेवला आहे, अशा माहितीवरून शहर पोलीसांनी रेड करून अरविंद शामराव निवलकर, वय 25 वर्षे, रा. हिदुस्थान लालपेठ कॉलरी नं.3, बाबुपेठ चंद्रपूर यांचे राहते घरातुन होला हुक्का शिशा तंबाखु प्लास्टिक पॉकीट, एकुण 45, पॉकीटचे वजन 1 किलो, प्रति किं. 750-, (एका पॉकीटामध्ये 200 ग्रॅम वजनाचे 5 तंबाखुचे पाकीट) असा एकुण 33750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Prohibited flavored tobacco seized

पुढील कार्यवाही करिता अन्न व औषध प्रशासन चंद्रपूर food and drugs department यांना पत्राव्दारे कळविण्यात आले असता पुढील कार्यवाही त्यांनी करून सरकारतर्फे दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर Chandrapur City Police Station येथे अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही सुदर्शन मुमक्का पोलीस अधिक्षक चंद्रपूर, रिना जनबंधु अपर पोलीस अधिक्षक, सुधाकर यादव उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात प्रभावती एकुरके पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर यांचे सुचनेप्रमाणे मंगेश भोगांडे स.पो.नि, संतोष निंभोरकर पोउपनि, सफौ/विलास निकोडे, पोहवा सचिन बोरकर, भावाना रामटेके, संतोष पंडीत, इम्रान खान गुन्हे शोध पथक पो. स्टे चंद्रपूर शहर यांनी केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular