Monday, November 11, 2024
HomeCrimeNEET परीक्षेतील घोटाळ्याची चौकशी करा - शफक शेख, जिल्हाध्यक्ष, एनएसयुआय
spot_img
spot_img

NEET परीक्षेतील घोटाळ्याची चौकशी करा – शफक शेख, जिल्हाध्यक्ष, एनएसयुआय

CBI inquiry into NEET exam scam – Shafaq Shaikh, District President, NSUI

चंद्रपूर :- NEET निट परीक्षेत मोठ्या प्रमाणात झालेल्या घोटाळ्याचा एनएसयुआय च्या वतीने निदर्शने करीत निषेध करण्यात आला.
NEET निट परीक्षेत मोठ्या प्रमाणात झालेल्या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करावी, परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी NSUI Chandrapur एनएसयुआय च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून करण्यात आली आहे. NEET exam scam

NEET परीक्षेत मोठ्या प्रमाणात झालेल्या हेराफेरीच्या विरोधात युवा नेते रोशन दादा बिट्टू यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसयूआय चंद्रपूर चे जिलाध्यक्ष शफ़क शेख़ यांच्या नेत्तृत्वात चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार निदर्शने करून परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

NEET चा निकाल जाहीर झाला आहे, यात झालेल्या घोटाळ्यामुळे देशात काही विद्यार्थी आत्महत्या करत आहेत, त्यामुळे NTA या एजन्सी वर बंदी घालण्यात यावी, सीबीआय चौकशी करावी, एनईईटी परीक्षा पुन्हा घेण्यात यावी आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी NTA ला चंद्रपूर जिल्हाधिकारी यांचे मार्फत केली आहे. National Testing Agency

एनईईटी मधील दोषींना शिक्षा न झाल्यास यापेक्षाही मोठे आंदोलन करण्याचा ईशारा चंद्रपूर एनएसयूआय च्या वतीने देण्यात आला आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य प्रवीण पडवेकर, एनएसयूआयचे जिल्हा उपाध्यक्ष दानिश शेख, मनीष दास, साहिल दहिवले, विनीत डोंगरे, अभिनय बागडे, सारिका वाकुडकर, आशिष बावणे, स्मिथ फुलझले, प्रथम आस्वले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular