Campaign meeting of Prime Minister Modi, Priyanka Gandhi in Chandrapur
चंद्रपूर :- चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्र 13 करिता पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराने आपल्या विजयासाठी प्रचार मोहीम सुरू केली आहे. 1 एप्रिल पासून सुरू झालेल्या प्रचारात उमेदवार ठिकठिकाणी सभा, बैठका, मेळावे घेत आहेत.
महायुतीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांची चंद्रपुरात 8 एप्रिल रोजी जाहीर सभा होणार आहे तर महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस जेष्ठ नेत्या प्रियंका गांधी Priyanka Gandhi यांची जाहीर सभा होणार आहे.
भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांच्या प्रचारार्थ 8 एप्रिल रोजी चंद्रपुरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती आहे.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर Pratibha Dhanorkar यांच्या प्रचारार्थ येत्या 15 एप्रिल रोजी चंद्रपुरात येणार असल्याची माहिती आहे.
दोन्हीही वरिष्ठ नेत्यांची सभेची तारीख ठरली असून सभेचे स्थळ अद्याप निश्चित झालेले नाही.