12 house burglaries by inveterate criminals, LCB uncovers
चंद्रपूर :- मागील 20 वर्षांपासून चोरी, घरफोडी व इतर गुन्ह्यात फरार असलेला अट्टल गुन्हेगाराला LCB चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने सोने – चांदीचे दागिने विकण्याकरिता जातांना अटक केली त्याचे जवळून एकूण 12 घरफोडीच्या गुन्ह्यातील 19,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सुरेश मारोती कामरे (60 वर्ष) रा. पुनवट, ता. वणी, जि.यवतमाळ असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. Burglaries by inveterate criminals, LCB uncovers
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंगवर असतांना आरोपी सोने चांदीचे दागिने विकणेकरिता जात आहे, यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेत अंगझडती घेतली असता 2,61,000 रुपयांचे दागिने आढळून आले. Chandrapur Crime अट्टल गुन्हेगाराकडून 12 घरफोडी, LCB ने आणले उघडकीस
पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपी सुरेश कामरे याने आजपर्यंत भद्रावती पोलीस स्टेशन हद्दीत 1, वरोरा 3, सावली 1, मूल 1, तळोधी 5 तसेच नागभीड 1 अश्या एकूण 12 घरफोडीचे कृत्य केल्याचे कबूल केले. Jewelery worth 19 lakhs seized from a staunch criminal

आरोपी सुरेश कामरे, मागील 20 वर्षांपासून चोरी, घरफोडी व इतर गुन्ह्यात सक्रिय असून फरार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर करीत आहेत. Chandrapur Local Crime Branch
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार, पोउपनि सुनिल गौरकार, सफौ. धनराज करकाडे, पोहवा सुभाष गोहोकार, पोहवा सतिश अवथरे, रजनिकांत पुटावार, दिपक डोंगरे, चेतन गज्जलवार, सुरेंद्र महंतो, प्रफुल गारघाटे, प्रशांत नागोसे, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, अमोल सावे, दिनेश अराडे, मिलींद टेकाम सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली आहे.