Monday, March 17, 2025
HomeMaharashtraसेक्टर व बूथ स्तरावर संघटन बांधणी करा - ऍड सुनील डोंगरे ...

सेक्टर व बूथ स्तरावर संघटन बांधणी करा – ऍड सुनील डोंगरे बहुजन समाज पक्षाची जिल्हा बैठक संपन्न

Build organization at sector and booth level – Ad Sunil Dongre, State President BSP
District meeting of Bahujan Samaj Party concluded

चंद्रपूर :- आगामी काळात होणाऱ्या विधानसभा व इतर निवडणुकीच्या अनुषंगाने सेक्टर व बूथ स्तरावर नविन कार्यकर्ते तयार करा असे BSP बसपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एड सुनील डोंगरे यांनी चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीच्या महत्वपूर्ण बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. Build organization at sector and booth level

बहुजन समाज पार्टी जिल्हा कार्यकारीनीची महत्वपूर्ण बैठक दिनांक 11 जुलै रोजी शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली. बसपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एड सुनील डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
संघटन बांधणी संदर्भात सेक्टर व बूथ स्तरावर नविन कार्यकर्ते तयार करणे, येणाऱ्या काळातील विधानसभा निवडणूका व इतर अन्य विषयावर डोंगरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. District meeting of Bahujan Samaj Party concluded

बैठकीत बहुजन समाज पार्टी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष शिरीजकुमार गोगुलवार, जिल्हा प्रभारी प्रशांत रामटेके, जिल्हा प्रभारी धर्मेश निकोसे, जिल्हा प्रभारी मुक्कदर मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष रत्नाकर साठे, जिल्हा महासचिव सुभाष पेटकर, जिल्हा सचिव संजय मेश्राम, चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष अविनाश वानखेडे, सचिव मनोहर साखरे, चंद्रपूर शहर अध्यक्ष अमोल राहुलगडे, शहर महासचिव मंगेश, घुगुस शहर अध्यक्ष सिद्धार्थ कोंडागुर्ला, सुमेध पाटील ब्रह्मपुरी विधानसभा प्रभारी नंदू खोब्रागडे, सिंदेवाही शहर अध्यक्ष डोंगरे, बल्लारपूर विधानसभा अध्यक्ष किशन केसकर, विधानसभा उपाध्यक्ष मोहन जांभूळे, वरिष्ठ कार्यकर्ता प्रा.राजेश ब्राह्मने, वरोरा विधानसभा अध्यक्ष रवींद्र वानखेडे, जोशिल रामटेके , अमरदीप दसोडे, अखिल मिमगडे , विवेक दुपारे, संविधान अवताडे, सायलू घोंगले, आदित्य साळवे, अभिषेक येमुर्ले, सुजल बनकर व जिल्यातील असंख्य कार्यकर्ते उपसथित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular