Buddha Purnima was celebrated with great enthusiasm in Durgapur
चंद्रपुर :- शहरातील दुर्गापुर वार्ड नं. 3 मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर ट्रस्टच्या वतीने आज दि. 23 मे 2023 रोज गुरुवारला सांय 6:30 वा. बुद्धपौर्णिमा असल्यामुळे संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देणारे विश्व वंदनीय महाकारूणिक, तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी शिवसेना भारतीय कामगार संघटना (वाहतुक) चंद्रपुर जिल्हाध्यक्ष अरविंद धिमान, सामाजिक कार्यकर्त्ते अनिल दहिवले, भाजपा युवा नेता नागेश कडुकर, सामाजिक युवा कार्यकर्त्ते सचिन बाळस्कर, स्वप्निल खदांळे, शामवेल सिन्हा, कुणाल बोरकर, नवनाथ गावडें, हुसेन शेख, रोशन राठोड़, त्रिवार वंदन व गावकरी नागरिक यांची उपस्थिती होती.