Sunday, December 8, 2024
HomeSocialऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर येथे बुद्ध जयंती उत्साहात संपन्न
spot_img
spot_img

ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर येथे बुद्ध जयंती उत्साहात संपन्न

Buddha Purnima (Jayanti celebrated with enthusiasm at the historical Buddha Bhoomi Gadchandur

चंद्रपूर :- गडचांदुर येथील जोगाई पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक बुद्धभूमी येथे तथागत बुद्ध यांची 2568 वी जयंती साजरी करण्यात आली. Buddha Purnima

आज दिनांक 23 मे 2024 ला सकाळी 7 वाजता ऐतिहासिक बुद्धभूमी येथील ऐतिहासिक विहारात भंते कश्यप यांच्या प्रमुख उपस्थितीत बुद्ध वंदना घेण्यात आली. तदनंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म Buddha And His Dhamma या धम्मग्रंथाचे वाचन करण्यात आले.

 

सकाळी ठीक 8:30 वाजता तथागत बुद्ध यांच्या प्रतिमेचे पुजापाठ करून भंते कश्यप यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले. तदनंतर बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

तसेच ऐतिहासिक बुद्धभूमी येथील तथागत बुद्ध आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर Dr. Babasaheb Ambedkar यांच्या पुतळ्यासमोर अगरबत्ती मेणबत्ती लावून उपस्थित जणांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केल्यानंतर सामुहिक बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

कार्यक्रमास भंते कश्यप, अशोककुमार उमरे, गौतम भसारकर, संपादक प्रभाकर खाडे, मधुकर चुनारकर, देवराव भगत, पत्रूजी दुर्गे, सुनील वालदे, कुणाल वासेकर, कु. तेलंग, पडवेकर, मनोहरे, रविंद्र वाकडे, पोलिस मुंडे साहेब आणि इतर उपासक हजर होते.

कार्यक्रमानंतर मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular