Friday, February 7, 2025
HomeLoksabha Electionबीआरएस चे सुधीर मुनगंटीवार यांना समर्थन नाही ; जिल्हा समन्वयकाची भूमिका पक्षविरोधी

बीआरएस चे सुधीर मुनगंटीवार यांना समर्थन नाही ; जिल्हा समन्वयकाची भूमिका पक्षविरोधी

BRS does not support Sudhir Mungantiwar;  The role of BRS district coordinator is anti-party

चंद्रपूर :- बीआरएस भारत राष्ट्र समिती BRS चे जिल्हा समन्वयक वमशीक्रीष्णा अरकिल्ला यांनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील महायुती भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना समर्थनाचे दिलेले पत्र पक्षविरोधी धोरण असून, पक्षाने महाराष्ट्रात समर्थनाचे कोणतेही धोरण अवलंबविले नसल्याचे स्पष्टीकरण भारत राष्ट्र समितीचे राजुरा विधानसभा नेते भुधन फुसे यांनी श्रमिक पत्रकार संघाच्या आयोजित पत्रकार परिषदेत दिले. यावेळी जिल्हा समन्वयक वमशीकृष्णा अरकिल्ला यांचा निषेध ही नोंदविण्यात आला. BRS does not support Sudhir Mungantiwar बीआरएस ची भूमिका तटस्थ

भारत राष्ट्र समितीचे चंद्रपूर जिल्हा समन्वयक वमशीकृष्णा अरकिल्ला यांनी दिनांक 6 एप्रिल 2024 रोजी भारत राष्ट्र समिती पक्षाचे चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे महायुतीतील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना समर्थन दर्शवीत पत्र दिले, सदर समर्थनाचे पत्र पक्ष विरोधी असून, समर्थनाचे पत्र देण्याचा अधिकार जिल्हा समन्वयक यांना नाही तसेच राज्यात कोणाला समर्थन जाहीर करायचे असे कोणतेही निर्देश पक्षश्रेष्ठी व वरीष्ठ नेत्यांनी दिलेले नाही तसेच महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाला समर्थन द्यायचे नाही अशी पक्षाची भूमिका असल्याची फुसे यांनी सांगितले. The role of BRS district coordinator is anti-party

तेलंगाणा राज्यात केसीआर यांच्या नेतृत्वाखाली बीआरएस पक्षाचे मोठे जाळे असतांना बीआरएस चे 9 पैकी 5 खासदार भारतीय जनता पक्षाने पळविले आणि त्यांना भाजपाच्या कमळ चिन्हावर लढविले आहे, अशी वस्तुस्थिती असतांना जिल्हा समन्वयक अरकिल्ला यांनी घेतलेली भूमिका पक्ष विरोधी असून अधिकृत नाही.

बीआरएस चे संस्थापक अध्यक्ष केसीआर KCR व बीआरएस यांना मानणाऱ्या सर्व जनता व पदाधिकाऱ्यांनी कोणालाही समर्थन न देता तटस्थ राहावे असे आवाहन यावेळी भूषण फुसे यांनी केले आहे.

आयोजित पत्रपरिषदेत सुभाष हजारे, राकेश चिलकुलवार, प्रेमचंद पाल, सन्नि रेड्डी, पोहचना बाहेरम, संतोष वडकेलवार, संतोष कुंदावार, रणजित वर्मा, प्रदीप येरकल्ला, संघर्ष गडपेल्ली, धनंजय बोरडे आदी बीआरएस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular