Scrutiny of voter list by door to door visits from June 25 to July 24
Brief revision program of voter list announced
The administration started working; District officials held a meeting
चंद्रपूर :- आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, याकरीता भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुषंगाने सदर कार्यक्रमाअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) 25 जून ते 24 जुलै या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची तपासणी करणार आहे. जे मतदार 18 वर्षाचे झाले आहेत, अशा पात्र मतदारांचे नमुना क्र.6 भरुन नवीन नोंदणी करणे, मतदार यादीत मृत मतदार, दुबार मतदार व जे मतदार स्थलांतरीत झाले, अशा मतदारांचे नाव मतदार यादीतून कमी करून मतदार यादीतील त्रुटया दूर करण्यात येणार आहे. Scrutiny of voter list
विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आवश्यकतेनुसार मतदान केंद्राच्या नावात बदल, ठिकाणात बदल, पत्यात बदल करुन घेता येईल. उपरोक्त सर्व दुरुस्तीसह 25 जुलै रोजी एकत्रीकृत मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. 25 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत प्रसिध्द केलेल्या मतदार यादीवर दावे व हरकती सादर करता येईल. याच कालावधीत शनिवार आणि रविवार विशेष शिबिर आयोजित करण्यात येईल. विशेष शिबिराच्या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रावर उपस्थित राहून कार्यालयीन वेळेत नमुना क्र. 6. 7 आणि 8 स्वीकारतील व दि. 19 ऑगस्ट पर्यंत आलेल्या सर्व अर्जावर निर्णय घेऊन दावे व हरकती निकाली काढण्यात येऊन 20 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक : चंद्रपूर जिल्हयातील मतदार यादीच्या शुध्दीकरणाचे काम आगामी विधानसभा, निवडणूकीच्या अनुषंगाने करण्यात येत असून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी शुक्रवारी (दि. 21) राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. तसेच जिल्हयातील सर्व मतदारांना आणि सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आपले नाव मतदार यादीत असल्याबाबत खात्री करण्याचे आवाहन केले आहे. ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत आढळून आलेले नसेल, अशा मतदारांनी आपले नाव आवश्यक कागदपत्रासह नमुना क्र. 6 भरुन विहीत मुदतीत मतदार नोंदणी अधिकारी, सहा. मतदार नोंदणी अधिकारी, मतदार मदत केंद्र, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.