Thursday, September 12, 2024
spot_img
spot_img
HomeAccidentपहील्याच पावसात खचून पडलेल्या पुलाचे होणार नव्याने बांधकाम

पहील्याच पावसात खचून पडलेल्या पुलाचे होणार नव्याने बांधकाम

bridge that got tired in the first rain will be rebuilt                                                     Rashtriya Samaj Party (RSP) had complained

चंद्रपूर :- पडोली, दाताळा देवाडा, शिवणी, हडस्ती, गोवरी, माथरा, राजुरा रस्ता (राष्ट्रीय महामार्ग 372) HAM-NAG- 143 प्रकल्पांतर्गत 28/300 मध्ये मौजा गोवरी येथील नाल्यावर 10 मिटर span चे 5 गाळ्यांच्या पुल प्रस्तावित होता. सोबतच वळण रस्ता तयार करण्याचे काम सुरू होते. >> अनधिकृत होर्डिंग्स वर कारवाई करा

मात्र पहील्या पावसातच सदर पुल पुर्णतः खचल्या गेला. त्यामुळे सदर बांधकामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. एम बी.पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीने या रस्ता बांधकामात चुनखडी व गौण खनिज (मेजर मिनरल) चा वापर केल्याने रस्ता पुर्णतः उखडून गेला आहे.>> बीएस इसपात कंपनीचा कोळसा घोटाळा

सदर बांधकामात अवैध उत्खनन केल्या प्रकरणी एम.बी. पाटील कन्स्ट्रक्शन कंपणीवर 10 कोटी 80 लाख रुपये दंड ठोठावला आहे. नवीन बांधकाम केलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.>>  लाचखोर अधीक्षकांना अखेर सजा

या मार्गावर अनेक अपघात झाले असून अनेकांना अपंगत्व आले आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले जात असतांना सुध्दा विभाग कंत्राटदाराला पाठीशी घालत असल्याची तक्रार करण्यात आली होती.>>  वाघाच्या हल्ल्यात शेळीपालक ठार

राष्ट्रीय समाज पक्षाचे (रा स प) विदर्भ मुख्य महासचिव संजय कन्नावार यांनी या कामाची विभागीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. bridge that got tired in the first rain will be rebuilt

मागणीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 ने चौकशी करून कंत्राटदाराने जुने पुलाचे बांधकाम पाडून नवीन पुलाचे बांधकाम करण्याचे निर्देशीत केले आहे.>> चंद्रपूर मनपाचे अतिक्रमनात झुकते माप कोणाला

या निर्देशाने राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला यश प्राप्त झाले असून सामान्य नागरिकांना वाहतुकीकरिता योग्य पद्धतीचा मार्ग उपलब्ध होणार, यामुळे सामान्य नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular