Thursday, March 5, 2026
HomeElectionभाजपच्या नगरसेवक गटनेतेपदी शेखर शेट्टी यांची निवड

भाजपच्या नगरसेवक गटनेतेपदी शेखर शेट्टी यांची निवड

Shekhar Shetty has been elected as the BJP’s corporator group leader

चंद्रपूर :- महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीच्या वतीने २४ नगरसेवकांचा अधिकृत गट स्थापन करण्यात आला असून, या गटाच्या नेतृत्वाची धुरा इंडस्ट्रियल प्रभागातून विजयी झालेले नगरसेवक शेखर शेट्टी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. सोमवारी नागपूर येथील भाजपच्या विभागीय कार्यालयात या गटाची अधिकृत स्थापना करण्यात आली. Shekhar Shetty has been elected as the BJP’s corporator group leader

भाजपचे २३ आणि मित्रपक्षाचा १ असा एकूण २४ नगरसेवकांचा समावेश असलेल्या या गटासाठी गटनेतेपदी शेखर शेट्टी यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. या शिफारशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेश भाजप नेतृत्वाने मान्यता दिली. त्यानंतर शेखर शेट्टी यांच्या गटनेतेपदाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

या प्रसंगी सर्व २४ नगरसेवक नागपूर येथील विभागीय कार्यालयात उपस्थित होते. संघटनात्मक शिस्त, विकासाभिमुख धोरणे आणि महापालिकेत प्रभावी विरोधकाची भूमिका बजावण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. शेखर शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा नगरसेवक गट शहराच्या विकासासाठी आक्रमक आणि सकारात्मक भूमिका घेईल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला.

गटनेतेपदाची जबाबदारी स्वीकारताना शेखर शेट्टी यांनी पक्षश्रेष्ठी, मुख्यमंत्री आणि प्रदेश नेतृत्वाचे आभार मानले. “चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत भाजपचा नगरसेवक गट एकसंघपणे काम करेल,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
भाजपच्या या निर्णयामुळे महानगरपालिकेच्या राजकारणात नव्या नेतृत्वाचा उदय झाला असून, आगामी काळात महापालिकेतील महापौर निवडीत भाजप अधिक प्रभावीपणे आपला महापौर बसवेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular