Celebrating the birth anniversary of the Revolutionary Lahuji Salve
चंद्रपूर :- अखिल मातंग समाजाचे श्रध्दास्थान क्रांतीपिता लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीदिनी दि. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी बिनबा वार्डातील मातंग समाज सभागृहात त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
मातंग समाजाचे नेते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुस्कार प्राप्त राजुभाऊ येले यांच्या अध्यक्षस्थानी पार पडलेल्या या जयंती उत्सवाला समाजातील अनेक ज्येष्ठ मंडळी व युवक उपस्थित होते. यावेळी राजुभाऊ येले यांनी लहुजी वस्ताद हे थोर समाज सुधारक होते. स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांची राष्ट्रभक्ती व समाजातील युवकांना बलशाली बनविण्याच्या कार्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली.
क्रांतिसुर्य महात्मा फुले यांचे सहकारी म्हणून लहुजी वस्ताद यांनी तत्काळी युवकांना व्यायाम, दांडपट्टा व आरोग्य संवर्धनासाठी महानकार्य केल्याचेही येले यांनी यावेळी सांगितले.
या आदरांजली कार्यकमास बादल पोटफोडे, अरूण खंडारे, सुनिल डोंगरे, अमोल पोटफोडे, लखन ब्राम्हणे, भोला जाधव, रणदिप पंदराज, सुरेश अंजनकर, राजदिप पडघाने, किशोर वानखेडे, दादाराव डोंगरे यांचेसह अन्य समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी उपस्थित बांधवांनी लहुजी वस्ताद यांना आदरांजली अर्पण केली.